Home Uncategorized जिल्ह्यात सहा लाखांहून अधिक जणांनी घेतली नशामुक्तीची शपथ .

जिल्ह्यात सहा लाखांहून अधिक जणांनी घेतली नशामुक्तीची शपथ .

3 second read
0
0
6

no images were found

जिल्ह्यात सहा लाखांहून अधिक जणांनी घेतली नशामुक्तीची शपथ .

कोल्हापूर : सन 2026-27 या शैक्षणिक वर्षाच्या शालेय प्रथम दिनानिमित्त जिल्ह्यातील 3674 या सर्व शाळांमधील सुमारे पाच लाखांहुन अधिक विद्यार्थी तर एक लाखांहून अधिक ग्रामस्थ व पालकांनी आज मोठ्या दिमाखात ‘ नशामुक्त – कोल्हापूर ‘ या अभियानाची शपथ घेतली .
जिल्ह्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील अनेक विद्यार्थी हे तंबाखू ,गुटखा , गांजा, सिगारेट तसेच इतर मादक पदार्थांच्या विळख्यात अडकल्याचे मोठ्या प्रमाणावर निदर्शनास आले.पर्यायाने हे व्यसन विद्यार्थ्यांपुरतेच मर्यादित न राहता याचे चटके संपूर्ण कुटुंबियासह,समाजाला बसत होते नेमकी हीच बाब हेरून पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून नशामुक्त – कोल्हापूर अभियान राबविण्याचे ठरले .या अनुषंगाने सोमवार 15 जून रोजी शालेय प्रथम दिनानिमित्ताने प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाच्या सहाय्याने जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना नशामुक्तीची शपथ देण्याची कल्पना राबविण्यात आली. या संकल्पनेला कोल्हापूरवासियांनी आज न भुतो न भविष्यते असा प्रतिसाद दिला .
पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी भुदरगड तालुक्यातील नाधवडे विद्यामंदिर येथे तर कागल तालुक्यातील पिंपळगाव खुर्दमध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत त्याचबरोबर जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी करवीर तालुक्यातील वरणगे येथील जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करून विद्यार्थ्यांसह उपस्थित पालकांना व ग्रामस्थांना नशामुक्त – कोल्हापूर अभियानाबाबत शपथ दिली 
     जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या ‘नशामुक्त कोल्हापूर अभियान’अंतर्गत शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या व्यसनापासून दूर राहण्याची आणि समाजात जनजागृती करण्याची आज शपथ देण्यात आली. शिक्षणासोबतच सामाजिक बांधिलकी आणि सकारात्मक मूल्यांच्या जोपासनेबाबतचा संदेश या अभिनव उपक्रमातून देण्यात आला. तब्बल सहा लाखांहून अधिक जणांनी प्रतिसाद देत या उपक्रमाला जणू पोहच पावतीच दिली .

00000

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

एपीएसईझेडने एआय-आधारित परिवर्तनाला गती देण्यासाठी अमेरिकेतील कॅलेरिससोबतची भागीदारी मजबूत केली

एपीएसईझेडने एआय-आधारित परिवर्तनाला गती देण्यासाठी अमेरिकेतील कॅलेरिससोबतची भागीदारी मजबूत …