Home मनोरंजन येड लागलं प्रेमाचं मालिकेत धमाकेदार वळण : लावणी सम्राज्ञी आणि लोकप्रिय अभिनेत्री मेघा घाडगे यांची होणार एण्ट्री

येड लागलं प्रेमाचं मालिकेत धमाकेदार वळण : लावणी सम्राज्ञी आणि लोकप्रिय अभिनेत्री मेघा घाडगे यांची होणार एण्ट्री

4 second read
0
0
8

no images were found

येड लागलं प्रेमाचं मालिकेत धमाकेदार वळण : लावणी सम्राज्ञी आणि लोकप्रिय अभिनेत्री मेघा घाडगे यांची होणार एण्ट्री

स्टार प्रवाहच्या येड लागलं प्रेमाचं मालिकेत लावणी सम्राज्ञी आणि लोकप्रिय अभिनेत्री मेघा घाडगे यांची एण्ट्री होणार आहे. पद, पैसा आणि प्रतिष्ठा यापलीकडे जाऊन स्वतःची ओळख निर्माण करणारी विक्रांतिका रणशिंगे ही अतिशय रहस्यमय आणि प्रभावशाली व्यक्तिरेखा त्या साकारणार आहेत. यशस्वी उद्योजिका, समाजसेविका आणि आदर्श नेता म्हणून ओळखली जाणारी विक्रांतिका प्रत्यक्षात सत्तेचे खेळ पडद्यामागून खेळणारी एक कुशल रणनीतीकार आहे. तिच्या एका फोनवर निर्णय बदलतात आणि अनेकांचं भविष्य नव्याने लिहिलं जाते. राजकारणी, वरिष्ठ अधिकारी, बिल्डर्स आणि उद्योगपती तिच्याशी संबंध जपण्यातच आपलं हित मानतात. विक्रांतिकाला माणसांची पारख आहे. समोरच्याला विश्वास देऊन जिंकायचं, गरज पडली तर भीती दाखवायची आणि विश्वासघात झाला तर कोणतीही दया न दाखवता त्याची किंमत वसूल करायची हा तिचा स्वभाव.

या भूमिकेविषयी सांगताना मेघा घाडगे म्हणाल्या, ‘विक्रांतिका रणशिंगे ही माझ्या कारकिर्दीतील सर्वात वेगळी आणि आव्हानात्मक भूमिका आहे. जवळपास २० वर्षांनंतर मालिका विश्वात पुनरागमन करतेय. माझ्या स्वभावाशी मिळतं जुळतं हे पात्र आहे. सडेतोड उत्तर देणारी आणि अत्यंत करारी अशी ही भूमिका आहे. ऐकताक्षणीच मी या भूमिकेसाठी होकार दिला. विक्रांतिका प्रत्येक परिस्थितीचा विचार करून चाल खेळते. त्यामुळे प्रेक्षकांना तिचा पुढचा डाव काय असेल याची कायम उत्सुकता राहील. मला खात्री आहे विक्रांतिकाचं हे अनोखं रूप प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.’

विक्रांतिकाच्या येण्याने राया-मंजिरीच्या आयुष्यात नवं वादळ येणार आहे. तेव्हा येड लागलं प्रेमाचं मालिकेचे यापुढील भाग न चुकता पहा रात्री ११.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन
Comments are closed.

Check Also

दिव्यांग शाळांमध्ये पहिला दिवस उत्साहात साजरा विद्यार्थ्यांना भोजन आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप

दिव्यांग शाळांमध्ये पहिला दिवस उत्साहात साजरा विद्यार्थ्यांना भोजन आणि शैक्षणिक साहित्याचे…