no images were found
महापौर सौ.रुपाराणी निकम यांच्या जनता दरबारात 68 नागरिकांचे अर्ज दाखल
कोल्हापूर, : कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर सौ. रुपाराणी निकम यांनी कोल्हापूर शहरातील नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी व त्यांच्या अडचणी थेट जाणून घेण्यासाठी दर महिन्याच्या ५ तारखेला ‘जनता दरबाराचे आयोजन करण्यात येते. पंरतू या महिन्याच्या 5 तारखेला महापौर सौ. परगावी असल्याने हा जनता दरबार आज घेण्यात आला. हा जनता दरबार महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या जनता दरबारात 68 नागरिकांनी आपल्या विविध समस्या मांडत अर्ज दाखल केले.
या जनता दरबारात महापौर सौ.रुपाराणी निकम यांनी नागरिकांच्या तक्रारी व मागण्या प्रत्यक्ष ऐकून घेतल्या. तसेच प्राप्त झालेल्या तक्रारी तातडीने निकाली काढण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. जनता दरबारास प्रारंभ करण्यापूर्वी महापौर सौ. रुपाराणी निकम यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर जनता दरबारास सुरुवात करण्यात आली.
या जनता दरबारामध्ये विविध विभागाचे 68 अर्ज असून यामध्ये अतिरिक्त आयुक्त कार्यालयाशी 2, उप-आयुक्त कार्यालयाशी 2, नगररचना विभागाशी 26, पाणी पुरवठा विभागाशी 5, विभागीय कार्यालय क्रं.1 कडे 5, विभागीय कार्यालय क्रं.2 कडे 5, घरफाळ विभागाशी 1, आरोग्य प्रशासन विभागाशी 2, इस्टेट विभागाशी 2, अतिक्रमण विभागाशी 5, आरोग्य विभागाशी 5, सामान्य प्रशासन विभागाशी 1, दिव्यांग विभागाशी 1, उद्यान विभागाशी 1 व केएमटी विभाग 1 अर्ज दाखल झाले आहेत.
यावेळी उपमहापौर अक्षय जरग, अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, नरगसेवक वैभव माने, स्वरुप कदम, उप-आयुक्त परितोष कंकाळ, किरणकुमार धनवाडे, सहा.आयुक्त उज्वला शिंदे, स्वाती दुधाणे, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजीत घाटगे, आरोग्याधिकारी डॉ.प्रकाश पावरा, नगरसचिव सुनील बिद्री, करनिर्धारक संग्राहक सुधाकर चल्लावाड, उपशहर अभियंता सरेश पाटील, अरुणकुमार गवळी, पर्यावरण अभियंता समीर व्याघ्राबंरे, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे व विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.