Home Video नीट पेपरफुटी प्रकरणी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी होणाऱ्या आंदोलनाला महाराष्ट्र बहुजन आघाडीचा पाठिंबा

नीट पेपरफुटी प्रकरणी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी होणाऱ्या आंदोलनाला महाराष्ट्र बहुजन आघाडीचा पाठिंबा

6 second read
0
0
10

no images were found

नीट पेपरफुटी प्रकरणी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी होणाऱ्या आंदोलनाला महाराष्ट्र बहुजन आघाडीचा पाठिंबा

कोल्हापूर,(प्रतिनिधी):उद्या दि. ६ जून २०२५ रोजी दिल्ली येथे कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी शांततापूर्ण व लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला महाराष्ट्र बहुजन आघाडीचा संपूर्ण पाठिंबा असल्याची माहिती आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

नीट (NEET) परीक्षा पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले असून त्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड मानसिक तणाव निर्माण झाला असून अनेक विद्यार्थ्यांनी टोकाची पावले उचलल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन कॉकरोच जनता पार्टी विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आंदोलन करीत आहे.

केंद्र सरकारने या आंदोलनात सहभागी होणाऱ्या विद्यार्थी व युवकांवर कोणत्याही प्रकारची दडपशाही अथवा कारवाई करू नये. उलट विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेऊन त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी विनंती महाराष्ट्र बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.

यावेळी महाराष्ट्र बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रा. डॉ. अनिल माने, उपाध्यक्ष प्रमोद हुपरीकर, उपाध्यक्ष प्रकाश हुलस्वार, खजिनदार सुरेश जत्राटकर, जिल्हाध्यक्ष राजेंद्र कांबळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Video
Comments are closed.

Check Also

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयएचसीएल जबाबदार आदरातिथ्याकरिता वचनबद्ध

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयएचसीएल जबाबदार आदरातिथ्याकरिता वचनबद्ध  मुंबई, : जागतिक…