Home Uncategorized शासकीय निकष पाळून बकरी ईद साजरी करण्यात यावी – जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड

शासकीय निकष पाळून बकरी ईद साजरी करण्यात यावी – जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड

0 second read
0
0
7

no images were found

शासकीय निकष पाळून बकरी ईद साजरी करण्यात यावी – जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड

कोल्हापूर  : 4 मार्च 2015 पासून राज्यात महाराष्ट्र प्राणी रक्षण ( सुधारणा ) कायदा 1995 लागू करण्यात आला. या अधिनियमाने गाई ,वळूचीं व बैलांची कत्तल करण्यास मनाई करण्यात आली आहे .महाराष्ट्र प्राणी रक्षण सुधारणा कायद्यातील निकष पाळून जिल्ह्यात शांततेत बकरी ईद बकरी ईद साजरी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी केले .
जिल्हाधिकारी कार्यालय राजर्षी शाहू सभागृहात आज आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर समन्वय बैठक घेण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमीन, इचलकरंजी महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ.पल्लवी पाटील , पोलीस अधीक्षक निलोत्पल,कोल्हापूर मनपा उपायुक्त परितोष कंकाळ,जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ प्रमोद बाबर प्रामुख्याने उपस्थित होते . जिल्हाधिकारी म्हणाले,कत्तल खानाच्या अनुषंगाने डेटाबेस गोळा करण्यात यावा. तसेच नदी – नाल्यात प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यावी.त्याचबरोबर कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलीस विभागाने दक्षता घ्यावी असे निर्देशही त्यांनी दिले.
तर जिल्ह्यातीत 8 इंटर स्टेट बॉर्डर चेकपोस्टच्या ठिकाणी पशुसंवर्धन विभागाने नोडल ऑफिसरची नियुक्ती करावी असे निर्देश जिल्हा पोलीस अधिक्षक निलोत्पल यांनी दिले .
या बैठकीसाठी डॉ.महेश शेजाळ सहआयुक्त (पशुसंवर्धन) , डॉ .प्रशांत कुलकर्णी , डॉ प्रसाद भुतकर ,डॉ .जितेंद्र पाठक, डॉ,रवींद्र जंगम , डॉ श्याम कोळेकर , डॉ.मंगेश खिलारे आदी उपस्थित होते .

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

सीपीआर नूतनीकरण वास्तूचे मे अखेरीस मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत उद्घाटन होणार – मंत्री हसन मुश्रीफ

सीपीआर नूतनीकरण वास्तूचे मे अखेरीस मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत उद्घाटन होणार – मंत्र…