no images were found
कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांच्याकडून महामानवांना अभिवादन
कोल्हापूर, : शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी आज रुजू झालेल्या दिवशी कोल्हापूर शहरातील महामानवांच्या पुतळ्यांना अभिवादन करून आपल्या कारकीर्दीचा प्रारंभ केला.
डॉ. कामत यांनी शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा कार्यभार आज स्वीकारला. त्यानंतर सायंकाळी त्यांनी शहरातील महामानवांच्या पुतळ्यांना अभिवादन केले. ऐतिहासिक बिंदू चौक येथील हुतात्मा स्मारक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांचे पुतळे येथे पुष्प वाहून अभिवादन केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपतींचा पुतळा, दसरा चौक येथील छत्रपती शाहू महाराज यांचा पुतळा यांनाही अभिवादन केले. त्यानंतर राजर्षी शाहू महाराज समाधीस्थळाला भेट देऊन तेथे महाराजांच्या समाधीस्थळासमोर नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतले. अखेरीस कावळा नाका येथील करवीर राज्य संस्थापिका महाराणी ताराबाई यांच्या पुतळ्यालाही त्यांनी पुष्प वाहून अभिवादन केले.