Home स्पोर्ट्स डी. वाय पाटील ज्युनिअर कॉलेजची महिमा शिर्के सांगलीतील खुल्या महिला बुद्धिबळ स्पर्धेत द्वितीय

डी. वाय पाटील ज्युनिअर कॉलेजची महिमा शिर्के सांगलीतील खुल्या महिला बुद्धिबळ स्पर्धेत द्वितीय

3 second read
0
0
13

no images were found

डी. वाय पाटील ज्युनिअर कॉलेजची महिमा शिर्के सांगलीतील खुल्या महिला बुद्धिबळ स्पर्धेत द्वितीय

सांगली (प्रतिनिधी):येथे झालेल्या २० व्या कै. सौ. मीनाताई शिरगावकर स्मृती महिला खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेत डॉ. डी. वाय. पाटील ज्युनियर कॉलेज, कोल्हापूरची विद्यार्थिनी महिमा मिलिंद शिर्के हिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत द्वितीय क्रमांक पटकावला.

        या उल्लेखनीय यशाबद्दल तिला रोख रुपये १२,५००/- चे पारितोषिक प्रदान करण्यात आले. महिमाच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून तिचे कौतुक होत आहे. जिमखाना विभाग प्रमुख प्रा. सुदर्शन पोवार यांचे तिला मार्गदर्शन लाभले.संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, सल्लागार अशोकराव देसाई, प्राचार्य ए. बी. पाटील यांनी या यशाबद्दल महिमाचे अभिनंदन केले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In स्पोर्ट्स
Comments are closed.

Check Also

बझबॉल्झ आपली मजबूत उपस्थिती निर्माण करण्यास सज्ज

बझबॉल्झ आपली मजबूत उपस्थिती निर्माण करण्यास सज्ज मुंबई: बझबॉल्झ हा जागतिक स्तरावर लोक…