no images were found
एम.एड् अभ्यासक्रमाच्या प्रवेशासंदर्भात उद्या इच्छुकांसाठी ‘स्नेहभेट’
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र अधिविभागाअंतर्गत एम.एड् अभ्यासक्रमाच्या प्रवेशासंदर्भात व शिक्षणशास्त्र अधिविभागाची ओळख आणि शिक्षण क्षेत्रातील करियर संधी या विषयासंदर्भात इच्छुक उमेदवारांसाठी स्नेहभेटीचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी डॉ. विद्यानंद खंडागळे मार्गदर्शन करणार आहेत. तरी, उद्या, बुधवारी (दि. २०) सकाळी ११.३० वाजता इच्छुक सर्व प्रवेशार्थीनी शिक्षणशास्त्र अधिविभागाच्या छ. शाहू महाराज कक्षैत उपस्थित राहावे, असे आवाहन अधिविभाग प्रमुख डॉ.चेतना सोनकांबळे यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी सारिका पाटील (9822975685), कादंबरी खांडेकर (8381002949) व ममता घोटल (9403767382) यांच्याशी संपर्क साधावा.