Home उद्योग एपीएसईझेडची मरीन शाखा, अॅस्ट्रो ऑफशोअरने युरोपियन सबसी विस्तारासाठी ओशनियरिंग इंटरनॅशनल इंक. सोबत करार केला

एपीएसईझेडची मरीन शाखा, अॅस्ट्रो ऑफशोअरने युरोपियन सबसी विस्तारासाठी ओशनियरिंग इंटरनॅशनल इंक. सोबत करार केला

8 second read
0
0
4

no images were found

एपीएसईझेडची मरीन शाखा, अॅस्ट्रो ऑफशोअरने युरोपियन सबसी विस्तारासाठी ओशनियरिंग इंटरनॅशनल इंक. सोबत करार केला

अहमदाबाद, : भारतातील सर्वात मोठी एकात्मिक वाहतूक कंपनी असलेल्या अदाणी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडने (एपीएसईझेड), आपल्या अॅस्ट्रो ऑफशोअर या सागरी प्लॅटफॉर्ममार्फत, युरोपमधील विशेष ऑफशोअर आणि सबसी (समुद्राखालील) प्रकल्पांमध्ये काम करण्यासाठी आणि त्या क्षेत्रात व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी अमेरिकेतील अभियांत्रिकी आणि प्रगत तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी असलेल्या ओशनियरिंग इंटरनॅशनल इंक. सोबत करार केला आहे.

हा करार एपीएसईझेडच्या अति-खोल पाण्यातील समुद्रातील कामकाज आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विस्तार करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. यामुळे कंपनीला जगातील सर्वात मोठ्या एकात्मिक सागरी प्लॅटफॉर्मपैकी एक उभारण्याच्या धोरणाला अधिक बळ मिळणार आहे.

अॅस्ट्रो ऑफशोअरसाठी, अॅस्ट्रो अॅटलस हे पहिले (अल्ट्रा-डीपवॉटर) अति-खोल समुद्रात काम करणारे जहाज सादर करणे हे त्यांच्या सततच्या गुंतवणुकीचे उदाहरण आहे. कंपनी आधुनिक आणि उच्च दर्जाची क्षमता असलेली नवीन जहाजे खरेदी करून आपल्या ताफ्याचे आधुनिकीकरण करत आहे. यामुळे अॅस्ट्रो ऑफशोअरला उद्योगातील सर्वात नवीन आणि तंत्रज्ञानाने सुसज्ज जहाजांच्या ताफ्यांपैकी एक चालवण्याचे उद्दिष्ट साध्य करता येणार आहे. तसेच नवीन ऑफशोअर बाजारपेठेत प्रवेश करून एपीएसईझेडच्या सागरी व्यवसायाच्या वाढीला चालना मिळणार आहे.

एपीएसईझेडचे होल-टाइम डायरेक्टर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) श्री अश्वनी गुप्ता यांनी सांगितले कि, “हा विकास एपीएसईझेडच्या जागतिक स्तरावर विविध सागरी प्लॅटफॉर्म उभारण्याच्या उद्दिष्टाला पाठिंबा देतो. अॅस्ट्रो ऑफशोअरच्या वाढत्या उच्च दर्जाच्या जहाजांच्या ताफ्याला आणि ओशनियरिंगच्या खोल समुद्रातील अभियांत्रिकी आणि ROV (रिमोटली ऑपरेटेड व्हेइकल) तज्ज्ञतेला एकत्र करून आम्ही गुंतागुंतीच्या ऑफशोअर कामकाजातील आमची क्षमता वाढवत आहोत आणि युरोपमध्ये विस्तार करत आहोत.”

अॅस्ट्रो ऑफशोअरचे सीईओ श्री मार्क हम्फ्रीज म्हणाले: “अॅस्ट्रो अॅटलस या जहाजाच्या समावेशामुळे आमची कामकाजाची क्षमता लक्षणीयरीत्या वाढली आहे. तसेच आधुनिक आणि उच्च दर्जाच्या जहाजांमध्ये आम्ही करत असलेल्या सततच्या गुंतवणुकीचे हे प्रतीक आहे, विशेषतः अति-खोल समुद्रातील कामांसाठी. आजपर्यंतचे आमचे सर्वात मोठे आणि सर्वात सक्षम जहाज असल्याने, ते आम्हाला अधिक व्यापक आणि गुंतागुंतीच्या सागरी कामांना साहाय्य करण्यास आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजांना अधिक प्रभावीपणे प्रतिसाद देण्यास मदत करेल.”

सबसी (समुद्राखालील) कामांमध्ये पाण्याखालील केले जाणारे विशेष अभियांत्रिकी कामे येतात, जी ऑफशोअर ऊर्जा आणि सागरी पायाभूत प्रकल्पांसाठी अत्यंत महत्त्वाची असतात. यामध्ये केबल टाकणे, पाइपलाइन बसवणे, पाण्याखाली बांधकाम, तपासणी, देखभाल आणि खोल समुद्रातील दुरुस्ती यांचा समावेश होतो. या कामांसाठी अत्याधुनिक जहाजे, रिमोटली ऑपरेटेड व्हेइकल (ROV) प्रणाली आणि उच्च दर्जाच्या ऑपरेशनल क्षमता आवश्यक असते.

अॅस्ट्रो ऑफशोअरने आपल्या डीपवॉटर (खोल समुद्रातील) ताफ्यात ‘एनर्जी सवाना’ हे आधुनिक जहाज समाविष्ट करून आपली क्षमता वाढवली आहे. या जहाजाचे नाव बदलून ‘अ‍ॅस्ट्रो अ‍ॅटलास’ असे ठेवले जाणार आहे. हे 2021 मध्ये बांधलेले 97 मीटर लांबीचे डीपी 2 प्रकारचे मल्टीपर्पज सपोर्ट व्हेसल आहे. या जहाजात 150 टन क्षमतेचा सबसी (समुद्राखालील कामांसाठी) एएचसी क्रेन, 25 टन क्षमतेचा दुसरा क्रेन, ‘मूनपूल’ आणि 100 कर्मचाऱ्यांसाठी राहण्याची व्यवस्था आहे. हे जहाज समुद्राखाली बांधकाम, केबल टाकणे आणि पाइपलाइन बसवणे यांसारख्या विविध प्रकारच्या सागरी कार्यांना साहाय्य करण्यासाठी तयार करण्यात आले आहे,.

हे जहाज 3,000 मीटरपेक्षा जास्त खोल पाण्यातही काम करू शकते. त्यामुळे अॅस्ट्रो ऑफशोअरला अति-खोल समुद्रातील प्रकल्पांमध्ये प्रवेश मिळणार असून, अधिक गुंतागुंतीचे आणि उच्च मूल्याचे प्रकल्प हाताळणे शक्य होणार आहे. या जहाजातील प्रगत डीपी2 प्रणाली आणि मजबूत डिझाइन यामुळे कठीण समुद्री परिस्थितीतही सुरक्षित आणि कार्यक्षम कामकाज करणे शक्य होणार आहे

हा विकास एपीएसईझेडच्या त्या धोरणाशी सुसंगत आहे, ज्यामध्ये लॉजिस्टिक्स, ऑफशोअर सपोर्ट, सबसी अभियांत्रिकी आणि खोल समुद्रातील पायाभूत सुविधा यांचा समावेश असलेला जगातील सर्वात मोठा एकात्मिक सागरी प्लॅटफॉर्म उभारण्याचा उद्देश आहे. दीर्घकालीन योजनेंतर्गत कंपनी 200 जहाजांचा ताफा उभारण्याचे लक्ष्य ठेवत आहे. तसेच आर्थिक वर्ष 2031 पर्यंत 6,000 कोटी सागरी महसूल मिळवणे आणि 13,000 कोटी भांडवली गुंतवणूक करण्याची योजना आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In उद्योग
Comments are closed.

Check Also

पंढरपूर आणि सातारा येथे माजी सैनिकांसाठी एकात्मिक कल्याण केंद्र उभारण्यास मान्यता -राज्यपाल 

पंढरपूर आणि सातारा येथे माजी सैनिकांसाठी एकात्मिक कल्याण केंद्र उभारण्यास मान्यता -राज्यपा…