Home Uncategorized आरोग्य स्वच्छतेच्या कामकाजाबाबत आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी घेतला आढावा

आरोग्य स्वच्छतेच्या कामकाजाबाबत आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी घेतला आढावा

39 second read
0
0
26

no images were found

आरोग्य स्वच्छतेच्या कामकाजाबाबत आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी घेतला आढावा

कोल्हापूर, : शहरातील आरोग्य व स्वच्छता व्यवस्थापन अधिक सक्षम व शिस्तबद्ध करण्याच्या दृष्टीने आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी आज आढावा बैठक घेतली. ही बैठक दुपारी ताराबाई पार्क येथील निवडणूक कार्यालयात पार पडली.

            या बैठकीत आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी स्वच्छता व्यवस्थेतील वेळापत्रक काटेकोरपणे पाळण्याच्या सूचना दिल्या. सर्व आरोग्य निरीक्षकांनी दररोज सकाळी 6.00 वाजता आपल्या वॉर्डमध्ये उपस्थित राहावे, तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांनी सकाळी 6.20 वाजेपर्यंत बायोमेट्रिक पेंटिंग द्वारे हजेरी नोंदवून 6.30 वाजेपर्यंत प्रत्यक्ष कामास सुरुवात करावी, असे निर्देश देण्यात आले. मुकादमांनी प्रथम स्वतः नेमून दिलेल्या क्षेत्रात स्वच्छतेचे काम पूर्ण करून नंतर त्यांच्या देखरेखीचे काम करावे. सर्व आरोग्य निरीक्षकांनी आपल्या कार्यक्षेत्रातील मुकादमांची तात्काळ बैठक घेऊन दैनंदिन कामाचे योग्य नियोजन करावे, तसेच स्वच्छतेसाठी आवश्यक साहित्याची मागणी वेळेत करावी. सर्व साहित्य उपलब्ध करूनही कामात हलगर्जीपणा आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला. कार्यालयीन कामासाठी स्वतंत्र कर्मचारी नेमू नये, भागातील स्वच्छतेचे काम पूर्ण केल्यानंतरच कार्यालयीन कामकाज करण्याचे निर्देश दिले. तसेच दुपारी 3.00 ते 5.00 या वेळेत आरोग्य निरीक्षकांनी आपल्या कार्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले. दर 15 दिवसांनी आरोग्य निरीक्षकांच्या कामाचा आढावा घेतला जाणार असून, दरमहा स्वच्छता कामाचे मूल्यांकन करून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. सर्व कर्मचाऱ्यांचे एरिया मॅपिंग करून कामाचे नियोजन करण्याच्या सूचनाही यावेळी दिल्या. शहरातील हॉटेल्स, हॉकर्स झोन व खाऊ विक्रेत्यांची स्वतंत्र यादी तयार करून त्यांच्याकडील कचरा नियमित उचलण्यासह घनकचरा व्यवस्थापन अधिनियमानुसार स्वच्छता सेवा शुल्क आकारण्याचे निर्देशही देण्यात आले. तसेच मुख्य रस्त्यांच्या स्वच्छतेसाठी विशेष मोहीम राबविण्याचे आदेश देण्यात आले. प्रत्येक शनिवार व रविवारी प्रभागनिहाय फिरती करून स्वच्छतेची पाहणी करण्यात येणार असून, शहरातील 100 टक्के कचरा उठाव सुनिश्चित करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी सांगितले.

            या बैठकीस उपआयुक्त परितोष कंकाळ, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, शहर समन्वयक मेघराज चडचणकर, हेमंत काशीद तसेच सर्व विभागीय आरोग्य निरीक्षक उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…