no images were found
कलाकार गणपती बाप्पाचे आगमन करण्यास उत्सुक !
भारतात सर्वात जल्लोषात व आनंदात साजरा केला जाणारा सण गणेशोत्सव जवळ आला आहे आणि उत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. रस्त्यांवर विद्युत रोषणाई करण्यापासून घरांमध्ये भक्तीगीते गुंजण्यापर्यंत सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. एण्ड टीव्ही कलाकार देखील उत्साहात हा सण साजरा करण्याची तयारी करत आहेत, आपल्या व्यस्त वेळापत्रकामधून वेळ काढत भक्ती, आनंद व सर्जनशीलतेसह बाप्पाचे स्वागत करण्यास सज्ज आहेत. हे कलाकार आहेत नीहारिका रॉय (सावी, ‘घरवाली पेडवाली’), हिमानी शिवपुरी (कटोरी अम्मा, ‘हप्पू की उलटन पलटन’) आणि रोहिताश्व गौड (मनमोहन तिवारी, ‘भाबीजी घर पर है’). आगामी मालिका ‘घरवाली पेडवाली’मध्ये सावीची भूमिका साकारताना पाहायला मिळणाऱ्या नीहारिका रॉय म्हणाल्या, “आम्ही घरी गणपती बाप्पााला आणत नसलो तरी मला माझ्या मित्रमैत्रिणींच्या घरी साजरीकरणामध्ये सामील होणे आवडते. गणेश चतुर्थी सण आकर्षक सजावट, संगीत व भक्तीमय वातावरणासह माझे लक्ष वेधून घेतो. मी आधीच तयारीला सुरूवात करते, पारंपारिक पोशाख व आभूषणे खरेदी करते, पूजेचे नियोजन आणि मोदक तयार करण्यामध्ये मदत करते. मला उत्साहित करणारी बाब म्हणजे ढोल-ताशाचे सादरीकरण, त्याची ऊर्जा अत्यंत उत्साहवर्धक असते. मी अनेकदा तालमीत पाहायला देखील जाते आणि त्या वातावरणामध्ये भारावून जाते. यंदा माझी खरेदी झाली आहे आणि मी बाप्पाचे आगमन करण्यास उत्सुक आहे, फक्त घरामध्ये नाही तर माझ्या अवतीभोवती सर्वत्र आनंद व उत्सवी उत्साहाचा प्रसार करण्यास उत्सुक आहे.”
मालिका ‘हप्पू की उलटन पलटन’मध्ये कटोरी अम्माची भूमिका साकारण्यासाठी लोकप्रिय हिमानी शिवपुरी म्हणाल्या, “दरवर्षी मी गणेश चतुर्थीची आतुरतेने वाट पाहते. एक महिना अगोदर सणाच्या तयारीला सुरूवात करते, मी आकर्षक सजावटीच्या वस्तू, पूजेचे साहित्य खरेदी करते आणि मेनू देखील ठरवते. यंदा, मी नुकतेच बनवण्यास शिकलेले मोदक बनवणार आहे, आकर्षक रांगोळी काढणार आहे आणि माझे घर ताज्या फुलांसह सजवणार आहे. सर्व तयारी करण्याचा उत्साह, बाप्पाचे आगमन होत असल्याचा विचार आणि बाप्पा घरी आल्याची भावना यामधून मला खूप आनंद मिळतो. माझ्यासाठी हा सण फक्त प्रथा नाही तर माझे कुटुंब व मित्रमैत्रिणींसोबत आनंद व एकत्र क्षण साठवण्याबाबत आहे.” मालिका ‘भाबीजी घर पर है’मध्ये मनमोहन तिवारीची भूमिका साकारणारे रोहिताश्व गौड म्हणाले, “आमच्या घरामध्ये गणेश चतुर्थीसाठी तयारी खूप दिवस अगोदर सुरू होते. घरामध्ये साफसफाई केली जाते, रोषणाईसह सजावट केली जाते आणि पारंपारिक हिमाचली मिठाई बनवली जाते. माझे शूटिंगचे व्यस्त वेळापत्रक असताना देखील मी वेळात वेळ काढून माझी पत्नी व मुलांना प्रत्येक गोष्टीमध्ये मदत करतो. यावर्षी मी स्वत: सजावट व आरास डिझाइन केली आहे, जे खास व संस्मरणीय ठरेल. या सणाची खासियत म्हणजे मला जीवनाला उजाळा देण्याची, कृतज्ञता व्यक्त करण्याची आणि कुटुंबासोबत एकत्र उत्साहपूर्ण क्षणाचा आनंद घेण्याची संधी मिळते. बाप्पाचे आगमन करताना मनात विशिष्ट भावना निर्माण होते, जी शब्दांमध्ये सांगता येऊ शकत नाही.”