Home मनोरंजन बाई तुझा आशीर्वाद’ मालिकेतील अवनीचा पार पडला खास तुलाविधी सोहळा

बाई तुझा आशीर्वाद’ मालिकेतील अवनीचा पार पडला खास तुलाविधी सोहळा

7 second read
0
0
17

no images were found

बाई तुझा आशीर्वाद’ मालिकेतील अवनीचा पार पडला खास तुलाविधी सोहळा: नात्यांचा गोडवा अधोरेखित करणाऱ्या या उपक्रमाचं होतंय कौतुक

स्टार प्रवाहवर लवकरच सुरु होणाऱ्या ‘बाई तुझा आशीर्वाद’ मालिकेत दांगट कुटुंबात सुनेच्या म्हणजेच अवनीच्या रूपाने आनंदाची चाहूल लागली आहे. नव्या सुनेचं स्वागत जल्लोषात करण्यासाठी अक्षय तृतीयेचं निमित्त साधत दांगट कुटुंबाने अवनीचा भव्यदिव्य तुलाविधी केला. ढोल-ताशे आणि लेझीम खेळत अवनीचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. सगळ्या कुटुंबाने मिळून तिचं औक्षण केलं. सोहळ्याचं मुख्य आकर्षण ठरलेल्या तुलाविधी मध्ये अवनीच्या वजनाइतके आंबे अर्पण करण्यात आले. उपस्थित सगळ्यांसाठीच हा क्षण भारावणारा होता. सासरे आणि दिरांचं हे प्रेम पाहून अवनीच्या डोळ्यांतही आनंदाश्रू दाटले होते. प्रेम आणि आपुलकीने न्हालेला हा तुलाविधी सोहळा मालिकेतील नात्यांचा गोडवा अधोरेखित करणारा ठरला.

मराठी मालिका विश्वात नेहमीच समाजाशी निगडित आणि विचार करायला लावणारे विषय मांडणारी स्टार प्रवाह वाहिनी ‘बाई तुझा आशीर्वाद’ या मालिकेच्या निमित्ताने नवा विषय प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. घर चालवणारी, जबाबदाऱ्या समर्थपणे पेलणारी, नात्यांमध्ये समतोल साधणारी, स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी झगडणारी आणि घराला पूर्णत्व देणारी स्त्री म्हणजेच ‘बाई’ या मालिकेच्या केंद्रस्थानी आहे. ज्या घराला बाईच्या असण्याचीच सवय नाही, अशा पूर्णपणे पुरुषप्रधान घरात अवनीचं आगमन होतं… आणि तिथूनच सुरू होतो नात्यांचा नवा प्रवास. तिच्या येण्याने त्या घरात फक्त एक व्यक्ती नाही, तर समज, संवाद, आपुलकी आणि घरपण येतं. ‘बाई तुझा आशीर्वाद’ ही मालिका ठामपणे सांगते की बाई म्हणजे केवळ घर चालवणारी व्यक्ती नाही, तर ती घराला घर बनवणारी शक्ती आहे. तेव्हा नक्की पाहा नवी मालिका बाई तुझा आशीर्वाद २७ एप्रिलपासून रात्री १० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन
Comments are closed.

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…