Home Uncategorized तटाकडील तालीम चौक ते महाद्वाररोड परिसरात महापालिकेची अतिक्रमण विरोधी कारवाई

तटाकडील तालीम चौक ते महाद्वाररोड परिसरात महापालिकेची अतिक्रमण विरोधी कारवाई

33 second read
0
0
25

no images were found

तटाकडीलतालीम चौक ते महाद्वाररोड परिसरात महापालिकेची अतिक्रमण विरोधी कारवाई

कोल्हापूर,  : कोल्हापूर महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालय क्र. २ (छ. शिवाजी मार्केट) व अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून आज तटाकडील तालीम चौक ते ताराबाई रोड तसेच महाद्वार परिसरात संयुक्त अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान 3 लोखंडी टेबल, 11 पार्किंग जाळ्या, 4 स्टॅन्ड बोर्ड, 4 छत्र्या, 5 लोखंडी स्टॅन्ड, 3 लोखंडी कॉट, 2 कॅरेट, 15 लाकडी टेबल, 1 स्पीकर, 6 पुतळे, 20 लोखंडी पाईप, 1 लोखंडी स्टूल, 4 स्टॅन्ड, 2 रांगोळी बॅग, 1 ढकल गाडी व इतर साहित्य जप्त करण्यात आले.

            सदर कारवाई महापौर सौ. रुपाराणी निकम यांच्या आदेशानुसार, अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, उपआयुक्त किरणकुमार धनवाडे, सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे व शहर अभियंता रमेश मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये उपशहर अभियंता सुरेश पाटील, अतिक्रमण प्रमुख प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपीक सजन नागलोत तसेच अतिक्रमण विभाग व विभागीय कार्यालय क्र. २ मधील कर्मचाऱ्यांच्या पथकाने सहभाग घेतला.

            महापालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत शहरातील अनधिकृत फेरीवाले तसेच रस्त्यावर दुकाने बाहेर उभारण्यात आलेल्या अनधिकृत शेड्सवर यापुढेही कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित दुकानदार व फेरीवाल्यांनी आपले अनधिकृत अतिक्रमण त्वरित स्वत:हून काढून घ्यावे असे आवाहन महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…