no images were found
कंपनी सचिव हा प्राधान्यक्रमाचा पेशा बनणे आवश्यक ; सीएस पवन चांडक
कोल्हापूर: आयसीएसआय च्या कोल्हापूर चॅप्टरचा शुभारंभ हा २००५ साली झाला, आणि अगदी अलिकडेच कोल्हापूर चॅप्टरने २० वर्षाची कारकिर्द पूर्ण केली आहे. या चॅप्टरमध्ये १७४ सदस्य आहेत, ज्यामध्ये कार्पोरेट आणि प्रशिक्षणार्थी कंपनी सेक्रेटरी (सचिव) यांचा समावेश आहे. हे सर्वजण विविध नावाजलेल्या कंपन्यांशी संबंधित आहेत. कंपनीचे कामकाज कसे करावे आणि व्यापार-व्यवसायात प्रगती कशी साधावी, याबाबत ते सातत्याने मार्गदर्शन करीत असतात.
आयसीएसआयचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष सीएस पवन चांडक यांनी आज कोल्हापुरात आयसीएसआय च्या कार्यालयास भेट दिली. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी सीएस म्हणजे कंपनी सेक्रेटरी हा प्राधान्यक्रमाचा पेशा कसा होईल, यावर प्रकाशझोत टाकला.कंपनी सचिव हा कंपनीचा एक महत्त्वाचा अधिकारी असतो. तो कंपनीच्या कायदेशीर आणि प्रशासकीय कामांसाठी जबाबदार असतो.
आपल्या सदस्यांकडून सीएस या सारख्या पेशा-व्यवसायाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये मूळात आवड निर्माण करण्याचे उदिष्ट्य ठेऊन त्यासाठी सीएस अभ्यासक्रम अधिकाधिक उन्नत स्तरावरून शिकविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
सीएस मेंबर्स ला जागतिक ओळख कशी मिळेल,कॉर्पोरेट गव्हर्नन्स मध्ये सीएस ची भूमिका काय असेल.सीएस परीक्षेची इतकी पातळी गाठणे कठीण असते. पण अभ्यास आणि जिद्द या जोरावर सीएस होता येते. हा पेशा एवढा जुना असून विद्यार्थ्यांमध्ये या कोर्स बद्दल प्रबोधन करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. यासाठी आयसीएसआय ही शासनमान्य संस्था प्रयत्न करत आहे.कोल्हापूर सारख्या छोट्या शहरात सीएस चे कार्यक्षेत्र वाढविण्यात आयसीएसआय काय पावले उचलत आहे.सीएस हा पेशा इतर पेशांपासून वेगळा आहे.भागीदारी संस्था,पंचायत यांच्या बाबतीत आयसीएसआय योग्य पावले उचलत आहे. टेकनॉलॉजि च्या वाढत्या वापरामध्ये सीएस हा पेशा प्रसार करत आहे.
खाजगी कंपन्या आणि सरकारी कंपन्यामध्ये सीएसला संधी आहेत.सीएस करणाऱ्या विद्यार्थ्याना कमी खर्चात वरिष्ठ पदावर काम करण्याची संधी उपलब्ध होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कंपनी सेक्रेटरी होण्यासाठी तीन टप्पे पार करावे लागतात. बारावीनंतर कोणताही शाखेचा विद्यार्थी हा कंपनी सेक्रेटरी चा कोर्स करू शकतो तसेच पदवीनंतर देखील तुम्ही हा कोर्स करू शकता.
देशात सध्या दीड लाख कंपनी सेक्रेटरी ची आवश्यकता आहे. परंतु आयसीएसआय ही संस्था त्या प्रमाणात सेक्रेटरी देऊ शकत नाही. कारण ‘कंपनी सेक्रेटरी’ या पेशाचा तेवढा प्रचार प्रसार झालेला नाही. यावरून कंपनी सेक्रेटरी चे महत्व अधोरेखित होते. असे आयसीएसआय चे राष्ट्रीय अध्यक्ष सीएस पवन चांडक यांनी सांगितले.
सीएस या पेशाचे पाळंमुळं हे अनेक जिल्ह्यांमध्ये पसरलेले आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष सी एस पवन चांडक हे वेळोवेळी स्वतः त्यांच्या सदस्यांसह या जिल्ह्याना भेटी देत असतात. कोल्हापूर जिल्ह्यातील सीएस पेशा ची प्रगती व्हावी यासाठी कोल्हापूर कार्यालयाने ही भेट आयोजित केली होती. कोल्हापूर कार्यालयाच्या हद्दीत पश्चिम महाराष्ट्र येतो. तसेच सीएस पेशाचा प्रचार पश्चिम महाराष्ट्रात जास्तीत जास्त व्हावा आणि पश्चिम महाराष्ट्रीतील सीएस सदस्यांना व विद्यार्थ्यांना भेटता यावे यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता. असे कोल्हापूर चॅप्टर चे अध्यक्ष स्वप्नील पाटोळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. पत्रकार परिषदेस सीएस जयदीप पाटील, सीएस ज्योतिबा गावडे, सीएस सचिन बिडकर, सीएस प्रवीण निंगोरे, अमित कुमार, शाहिद महाबरी आदी उपस्थित होते.
8