Home सामाजिक ‘गोकुळ’चे शिल्‍पकार माजी चेअरमन स्‍व. आनंदराव पाटील-चुयेकर यांची ८८ वी जयंती गोकुळमध्‍ये साजरी…

‘गोकुळ’चे शिल्‍पकार माजी चेअरमन स्‍व. आनंदराव पाटील-चुयेकर यांची ८८ वी जयंती गोकुळमध्‍ये साजरी…

24 second read
0
0
33

no images were found

‘गोकुळ’चे शिल्‍पकार माजी चेअरमन स्‍व. आनंदराव पाटील-चुयेकर यांची ८८ वी जयंती गोकुळमध्‍ये साजरी…

 

कोल्हापूर, (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्‍या वतीने संघाच्‍या  ताराबाई पार्क येथील विकासकक्ष कार्यालयात गोकुळचे शिल्पकार माजी चेअरमन स्व. आनंदराव ज्ञानदेव पाटील-चुयेकर यांची ८८ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील व संचालक यांच्या हस्ते स्व. आनंदराव पाटील-चुयेकर यांच्‍या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी उपस्थितीत होते.

       यावेळी गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले कि, गोकुळ दूध संघाच्या उभारणी व वाटचालीत स्वर्गीय आनंदराव पाटील-चुयेकर यांचे मोलाचे योगदान आहे. १९६३ साली अवघ्या ७०० लिटर दूध संकलनापासून सुरू झालेल्या गोकुळ दूध संघाने आज २० लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा गाठला आहे. या सर्व प्रगतीमध्ये चुयेकर साहेबांचे योगदान कदापि विसरता येणार नाही.

       दूध उत्पादक शेतकऱ्यांप्रती असलेली त्यांची तळमळ व त्यांनी घेतलेले धाडसी निर्णय यामुळेच गोकुळ आज यशाच्या शिखरावर पोहोचला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गावोगावी धवल क्रांती निर्माण करून गोकुळच्या माध्यमातून ग्रामीण जीवन समृद्ध करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या आचार-विचारांवरच गोकुळची भविष्यातील वाटचाल सुरू राहील, असेही त्यांनी सांगितले.

       यावेळी ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.एम.पी.पाटील यांनी केले. याप्रसंगी चेअरमन नविद मुश्रीफ, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक युवराज पाटील, संभाजी पाटील, बाळासो खाडे, संचालिका अंजना रेडेकर, पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ. प्रकाश साळुंके, संकलन व्यवस्थापक दत्तात्रय वागरे, डॉ. प्रकाश दळवी, धनाजी पाटील, के.डी.आमते, बाजीराव मुडूकशिवाले, अशोक पुणेकर, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील तसेच संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक
Comments are closed.

Check Also

कर्जमाफी योजनेवरील विरोधकांची टीका दिशाभूल करणारी-हेमंत पाटील  पात्र शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचवण्यावर सरकारचा भर पुणे,: महाराष्ट्र सरकारच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजने’वर विरोधकांकडून सातत्याने केली जाणारी टीका राजकीय हेतूने प्रेरित आहे, असा दावा भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी केला आहे. शेतकरी हितार्थ सरकारने उचललेल्या भूमिकेचे त्यांनी स्वागत केले आहे. मंत्रिमंडळ टिपणाचा हवाला देत कर्जमाफी योजनेतील पात्रतेच्या अटींमुळे राज्यावरील आर्थिक भार कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, या अटींचा उद्देश शेतकऱ्यांना वंचित ठेवणे नसून, प्रत्यक्ष गरजू आणि पात्र शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवणे हा आहे; असे प्रतिपादन पाटील यांनी केले. राज्य सरकारने अत्यंत जबाबदारीने ही योजना तयार केली आहे. सार्वजनिक निधीचा योग्य वापर व्हावा आणि कर्जमाफीचा लाभ खऱ्या अर्थाने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनाच मिळावा, यासाठी काही निकष ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे योजनेची परिणामकारकता वाढणार असून, निधीचा अपव्यय टाळण्यास मदत होईल, असे पाटील म्हणाले. विरोधकांनी योजनेतील अटींचा आधार घेत सरकारवर टीका करण्याऐवजी शेतकऱ्यांच्या हितासाठी विधायक सूचना द्याव्यात, असे आवाहनही त्यांनी केले. राज्य सरकारने कर्जमाफीबरोबरच सिंचन, पीकविमा, कृषी पायाभूत सुविधा आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. शेतकरी कल्याण आणि कृषी क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी सरकार कटिबद्ध असून, या योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना होणार असल्याचा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

कर्जमाफी योजनेवरील विरोधकांची टीका दिशाभूल करणारी-हेमंत पाटील  पात्र शेतकऱ्यांपर्यंत …