Home Uncategorized बागल चौक ते बी.टी.काँलेज परिसरातील अनाधिकृत अतिक्रमणावर कारवाई

बागल चौक ते बी.टी.काँलेज परिसरातील अनाधिकृत अतिक्रमणावर कारवाई

22 second read
0
0
24

no images were found

बागल चौक ते बी.टी.काँलेज परिसरातील अनाधिकृत अतिक्रमणावर कारवाई

कोल्हापूर : महापालिकेच्या विभागीय कार्यालय क्रं.3 राजारामपुरी व अतिक्रमण निर्मुलन पथकामार्फत आज बागल चौक ते बी.टी.काँलेज परिसर या ठिकाणी कारवाई करण्यात आली. या कारवाईवेळी 3 शेड, 6 स्टँण्ड बोर्ड, 4 लाकडी व लोखंडी टेबल, 6 लोंखडी पार्किंग जाळी, 32 शीट कव्हर मँट नग व इतर साहित्य जप्त करण्यात आले. या  कारवाई वेळी काही हातगाडया मालकांनी स्वता:हून काढून घेतल्या.

            सोमवारी झालेल्या जनता दरबारमध्ये अतिक्रमणाबाबत तक्रार अर्ज दाखल झाला होता. या अर्जाच्या अनुषंगाने व महापौर सौ.रुपाराणी निकम यांनी दिलेल्या आदेशानुसार महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन विभागामार्फत हि कारवाई करण्यात आली.

            सदरची कारवाई महापौर सौ.रुपाराणी निकम यांच्या आदेशाने, अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, शहर अभियंता रमेश मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली, उप-शहर अभियंता अरुण गुजर, अतिक्रमण प्रमुख प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपीक सजन नागलोत, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी व विभागीय कार्यालय क्र.03 कडील कर्मचा-यांच्या पथकाकडून संयुक्तीक करण्यात आली.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…