Home Uncategorized अदाणी डिफेन्सने भारतीय सैन्याला देशात तयार केलेल्या हलक्या मशीन गन्स ची पहिली डिलिव्हरी 

अदाणी डिफेन्सने भारतीय सैन्याला देशात तयार केलेल्या हलक्या मशीन गन्स ची पहिली डिलिव्हरी 

34 second read
0
0
20

no images were found

अदाणी डिफेन्सने भारतीय सैन्याला देशात तयार केलेल्या हलक्या मशीन गन्स ची पहिली डिलिव्हरी 

·        अदाणी डिफेन्स अँड एरोस्पेसने भारतीय सैन्याला ‘प्रहार’ नावाच्या 2,000 हलक्या मशीन गन्स (एलएमजी) चा पहिला ताफा दिला आहे.

·        हा एक महत्त्वाचा टप्पा आहे, कारण मोठ्या प्रमाणावर देशातच एलएमजी तयार करणारी अदाणी डिफेन्स ही भारतातील पहिली खाजगी कंपनी ठरली आहे.

·        या प्रकल्पातील कारखाना दरवर्षी 1 लाख शस्त्रे तयार करू शकतो आणि या शस्त्रांपैकी 90% पेक्षा जास्त भाग देशांतर्गत तयार केला जातो, ज्यामुळे मध्य प्रदेशात स्थानिक उद्योगांना चालना मिळत असून रोजगाराच्या संधीही वाढत आहेत.

नवी दिल्ली, : अदाणी एंटरप्रायझेस लिमिटेडची प्रमुख कंपनी आणि भारतातील एरोस्पेस व संरक्षण क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या अदाणी डिफेन्स अँड एरोस्पेसने भारतीय सैन्याला देशात तयार केलेल्या ‘प्रहार’ 7.62 मिमी हलक्या मशीन गन्स (एलएमजी) पैकी 2,000 बंदुका दिल्या आहेत. यामुळे भारताच्या लहान शस्त्रनिर्मिती क्षमतेत एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.

       पहिल्या ताफ्याची ही ऐतिहासिक डिलिव्हरी फक्त 7 महिन्यांत पूर्ण झाली. हा कालावधी करारात निश्चित केलेल्या वेळेपेक्षा 11 महिने आधीचा होता. या शस्त्राचा पहिला उत्पादन नमुना (FOPM) केवळ 6 महिन्यांत तयार करण्यात आला, जो नियोजित 18 महिन्यांच्या कालावधीपेक्षा खूप कमी वेळात पूर्ण झाला. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर उत्पादनासाठी परवानगी (बल्क प्रॉडक्शन क्लिअरन्स’) मिळाली आणि उत्पादन वेगाने सुरू करण्यात आले.

      या कार्यक्रमाला भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाचे महासंचालक (अधिग्रहण) आणि अतिरिक्त सचिव श्री ए. अंबरासू आणि भारतीय सशस्त्र दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

       मध्य प्रदेशातील ग्वालियर येथे अदाणी डिफेन्सच्या स्मॉल आर्म्स फॅसिलिटीमध्ये ‘प्रहार’ मशीन गन तयार केली जाते. हा भारतातील खाजगी क्षेत्रातील पहिला पूर्णपणे एकत्रित लहान शस्त्रनिर्मिती प्रकल्प आहे. या उत्पादनामुळे परदेशातून शस्त्रे आयात करण्याची गरज कमी होईल आणि भारताची संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता वाढेल. 100 एकर क्षेत्रात पसरलेल्या या प्रकल्पात बॅरल तयार करणे, बोल्ट आणि रिसीव्हर बनवणे, आधुनिक सीएनसी मशिनिंग, रोबोटिक्स, सरफेस प्रक्रिया, अचूक मोजमाप (मेट्रोलॉजी), धातूशास्त्र प्रयोगशाळा आणि 25 मीटर लांबीची भूमिगत फायरिंग रेंज अशा अत्याधुनिक सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत.प्रत्येक शस्त्र वापरासाठी देण्यापूर्वी त्याची संपूर्ण तपासणी केली जाते. यामध्ये त्याचा दीर्घकालीन वापर (लाइफसायकल टेस्टिंग), गोळीबाराची चाचणी (बॅलिस्टिक टेस्ट) आणि वेगवेगळ्या वातावरणातील चाचण्या घेतल्या जातात. त्यामुळे ही शस्त्रे भारतीय सशस्त्र दलांच्या गुणवत्ता आणि विश्वासार्हतेच्या मानकांनुसार तयार असल्याची खात्री होते.

       Bग्वालियरमधील हा प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उत्पादनासाठी तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पात दरवर्षी 1 लाखांपर्यंत शस्त्रे तयार करण्याची क्षमता आहे आणि त्यातील 90% पेक्षा जास्त साहित्य देशातच मिळते. ही सुविधा मध्य प्रदेशात व्यापक औद्योगिक परिसंस्था उभी करण्यास मदत करत आहे. यामुळे कुशल रोजगार निर्माण होत असून पुरवठा साखळीतील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSMEs) देखील फायदा होत आहे.

       याशिवाय, उत्तर प्रदेशातील कानपूर येथे अदाणी डिफेन्सने 2024 मध्ये सुरू केलेल्या दारुगोळा प्रकल्पामुळे या उत्पादन क्षमतेला अधिक बळ मिळत आहे. या प्रकल्पात दरवर्षी सुमारे 30 कोटी लहान कॅलिबरच्या दारुगोळा तयार करण्याची क्षमता आहे. पुढे मोठ्या आणि मध्यम कॅलिबरच्या दारुगोळ्याचे उत्पादन वाढवण्याचीही योजना आहे, ज्यामुळे शस्त्र आणि दारुगोळा उत्पादनाची एकत्रित व्यवस्था अधिक मजबूत होणार आहे.

      डिझाईन, उत्पादन आणि पुरवठा साखळी या सर्वांचा एकत्रित वापर केल्यामुळे काम अधिक मजबूत आणि जलद होते. यामुळे वेळेत काम पूर्ण होते आणि संरक्षण क्षेत्रात दीर्घकालीन आत्मनिर्भरता साध्य करण्यास मदत होते.आगामी काळात ग्वालियर येथील हा प्रकल्प भारतीय सशस्त्र दलांसाठी क्लोज क्वार्टर बॅटल (CQB) शस्त्रे देखील तयार करणार आहे. त्यामुळे भारताची देशांतर्गत लहान शस्त्रनिर्मिती क्षमता आणखी वाढणार आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…