Home सामाजिक विद्यापीठाजवळील केएसबीपी चौकात होणार अजितदादा पवार यांचे स्मारक

विद्यापीठाजवळील केएसबीपी चौकात होणार अजितदादा पवार यांचे स्मारक

6 second read
0
0
7

no images were found

विद्यापीठाजवळील केएसबीपी चौकात होणार अजितदादा पवार यांचे स्मारक

      वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या पाहणीनंतर जागा झाली निश्चित

कोल्हापूर : दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने उभारण्यात येणाऱ्या स्मारकासाठी विद्यापीठाजवळील केएसबीपी चौकातील महापालिकेची जागा गुरुवारी अंतिम करण्यात आली. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक व महापौर रुपाराणी निकम यांच्या पाहणीनंतर अजितदादा पवार यांच्या स्मारकासाठी या जागेवर शिक्कमोर्तब करण्यात आले. कोल्हापुरातील आर्किटेक्ट सुनील पाटील या स्मारकाचा प्लॅन तयार करणार असून त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.
स्व.अजितदादा पवार यांचे कोल्हापुरसाठी मोठे योगदान असून त्यांचे कोल्हापुरात स्मारक होण्यासाठीचा ठराव पहिल्याच सर्वसाधारण सभेत घेण्यात आला होता. त्यानंतर महापालिकेच्यावतीने जागेचा शोध सुरु होता. विद्यापीठाजवळील केएसबीपी चौकातील महापालिकेची अर्धा एकरापेक्षा जास्त जागा खासगी कंपनीला सुशोभीकरणासाठी देण्यात आली होती. या जागेची वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, महापौर सौ रूपाराणी निकम यांनी गुरुवारी पाहणी केली. मुख्य चौकात जागा असल्याने वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी या जागेला तत्काळ हिरवा कंदील दर्शविला. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, अजित पवार यांच्या पुतळा व स्मारकासाठी केएसबीपीची जागा योग्य आहे. अत्यंत दर्शनी भागात ही जागा असून बाहेरुन कोल्हापुरात येणाऱ्या लोकांना अजितदादा पवार यांच्या पुतळ्याचे सहजपणे दर्शन घेता येणार आहे. योगायोगाने या जागेवर अजितदादा पवार यांचा पदस्पर्श झाला आहे. या परिसरातील राजाराम महाविद्यालयाला अजितदादा पवार यांनी निधी दिला होता. अजितदादा पवार यांचे कोल्हापूरशी घट्ट ऋणानुबंध राहिले आहेत. त्यांच्या असंख्य आठवणी कोल्हापुरशी जोडल्या आहेत. थेट पाईपलाईन, आयटी पार्क, शासकीय महाविद्यालय अशा अनेक प्रकल्पांसाठी अजितदादा पवार यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे त्यांचे स्मारक सरकारच्या सहकार्याने महापालिका उभारत आहे याचा आनंद आहे. यावेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी स्मारक व पुतळ्याचा प्लॅन आर्किटेक्ट सुनील पाटील यांना तयार करायला सांगा अशा सूचना अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांना दिल्या.
महापौर सौ रूपाराणी निकम म्हणाल्या, अजितदादा पवार यांची आठवण राहवी यासाठी हे स्मारक उभारण्यात येत आहे. दोन-तीन जागांमध्ये केएसबीपीची जागा जास्त योग्य असल्याने ही जागा अंतिम केली आहे.
खासदार धनंजय महाडिक यांनी यावेळी बोलताना अजितदादा पवार यांच्या स्मारकासाठी पाहिलेली जागा मोक्याची आहे. विमानतळावर येताना पहिल्यांदा दर्शनी भागात अजितदादा पवार यांचा पुतळा दिसेल. या जागेचे चांगले सुशोभीकरण करुन एक दर्जेदार पुतळा महाराष्ट्रात पहिल्यांदा कोल्हापुरात होईल. जागा निश्चित झाली असून पुढील प्रक्रिया पूर्ण करुन लवकरच पुतळ्याचे काम सुरू होईल.
          यावेळी उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, परिवहन समिती सभापती सत्यजित जाधव, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शहर अभियंता रमेश मस्कर, गटनेता मुरलीधर जाधव, आदिल फरास, नगरसेवक विजय जाधव, उप शहर अरुण गुजर, भैय्या माने, सतीश लोळगे उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक
Comments are closed.

Check Also

भावुक कोर्टरूम ड्रामामध्ये अन्विताने जिंकली स्वातंत्र्याची लढाई, सोनी सबच्या इत्ती सी खुशी मध्ये

भावुक कोर्टरूम ड्रामामध्ये अन्विताने जिंकली स्वातंत्र्याची लढाई, सोनी सबच्या इत्ती सी खुशी…