no images were found
“उत्सवापासून कौटुंबिक क्षणांपर्यंत: सोनी सब कलाकारांनी गुढीपाडव्याचा उत्साह साजरा केला”
गुढीपाडवा आनंद, परंपरा आणि नव्या सुरुवातींचं वचन घेऊन साजरा केला जातो. घराबाहेर पारंपरिक गुढी उभारण्यापासून ते स्वादिष्ट पदार्थ बनवण्यापर्यंत आणि आपल्या प्रियजनांसोबत एकत्र येण्यापर्यंत, या सणात नवचैतन्याची भावना असते जी कुटुंबं आणि समाजाला एकत्र आणते. प्रत्येक घर आपापल्या पद्धतीने गुढीपाडवा साजरा करतं, पण या सणाचं खरं सौंदर्य त्या छोट्या छोट्या कृतींमध्ये दडलेलं असतं — घर सजवणं, सणाच्या जेवणाचा आनंद घेणं आणि नव्या वर्षाचं स्वागत आशा आणि कृतज्ञतेने करणं.या गुढीपाडव्याच्या निमित्ताने, सोनी सब चे कलाकार अक्षया हिंदळकर, श्रेणू पारिख, ऋषी सक्सेना, दीक्षा जोशी आणि रजत वर्मा यांनी सणाच्या उत्साहाशी आपला नातं कसं जोडलेलं आहे, तसेच परंपरा आणि आठवणींमुळे हा दिवस त्यांच्यासाठी कसा खास ठरतो, याबद्दल सांगितलं.
अक्षया हिंदळकर, जी ‘पुष्पा इम्पॉसिबल’मध्ये राशी पटेलची भूमिका साकारते, सांगते “हा गुढीपाडवा माझ्यासाठी खास आहे कारण लग्नानंतरचा हा माझा पहिला गुढीपाडवा आहे. लहानपणापासून हा सण म्हणजे नवी सुरुवात, सकारात्मकता आणि आयुष्यातील नव्या अध्यायाचं स्वागत असं माझ्यासाठी नेहमीच राहिलं आहे. यंदा ही भावना आणखी अर्थपूर्ण वाटते कारण मी तो माझ्या नव्या कुटुंबासोबत साजरा करतेय आणि नव्या परंपरा, प्रेम आणि एकत्रतेला सामावून घेतेय. सकाळी लवकर उठणं, घर सजवण्यात मदत करणं, सणाचे पदार्थ एकत्र बनवणं आणि श्रद्धा व आनंदाने गुढी उभारताना पाहणं — यात एक वेगळाच ऊबदारपणा आहे. मला नव्या आठवणी तयार करण्याची आणि या सणाला खास बनवणाऱ्या परंपरा पुढे चालवण्याची उत्सुकता आहे. मी सर्वांना आनंदी आणि समृद्ध गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देते.”
श्रेणू पारिख, जी ‘गणेश कार्तिकेय’मध्ये देवी पार्वतीची भूमिका साकारते, सांगते “गुढीपाडवा गेल्या काही वर्षांत माझ्यासाठी खूप खास सण बनला आहे. मी गुजराती असल्यामुळे लहानपणी आमच्या सुंदर परंपरा साजऱ्या करत मोठी झाले, पण लग्नानंतर महाराष्ट्रीयन कुटुंबात आल्यावर मला गुढीपाडव्याचा आनंद आणि महत्त्व जवळून अनुभवायला मिळालं. कुटुंबात झालेला हा सांस्कृतिक आदानप्रदान खूप सुंदर आहे आणि मला खरंच जाणवतं की सण वेगवेगळ्या परंपरा एकत्र आणतात आणि त्यातून एक ऊबदार भावना निर्माण होते. सर्वांना आनंदी आणि समृद्ध गुढीपाडव्याच्या शुभेच्छा! हे नवं वर्ष सकारात्मकता, उत्तम आरोग्य आणि आपल्या प्रियजनांसोबत अनेक सुंदर क्षण घेऊन येवो.”
ऋषी सक्सेना, जो ‘इत्ती सी खुशी’मध्ये संजय भोसलेची भूमिका साकारतो, सांगतो “गुढीपाडवा हा नेहमीच सकारात्मकता आणि नव्या सुरुवातींचं सुंदर प्रतीक असलेला सण राहिला आहे. गेल्या काही वर्षांत मराठी इंडस्ट्रीत काम करताना मला या सणाचा उत्साह आणि रंगत जवळून अनुभवायला मिळाली. माझे अनेक जिवलग मित्र महाराष्ट्रीयन आहेत आणि त्यांच्या माध्यमातून मला गुढीपाडव्याशी जोडलेल्या परंपरा आणि भावना खरंच समजल्या. घराबाहेर उभारलेल्या सुंदर सजवलेल्या गुढ्या पाहणं, सणाच्या जेवणाचा आनंद घेणं आणि वातावरणात भरलेला उत्सवी उत्साह अनुभवणं हे सगळं पाहताना नेहमीच आनंद वाटतो की कुटुंबं इतक्या श्रद्धा आणि आनंदाने मराठी नववर्षाचं स्वागत करतात. मित्रांसोबत हा सण इतक्या अभिमानाने साजरा होताना पाहून मला या सणाशी एक वेगळंच नातं जोडल्यासारखं वाटतं. गुढीपाडवा साजरा करणाऱ्या सर्वांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा हा सण आनंद, समृद्धी आणि सुख घेऊन येवो.”
दीक्षा जोशी, जी ‘पुष्पा इम्पॉसिबल’मध्ये दीप्तीची भूमिका साकारते, सांगते “मी मनाने गुजराती असले तरी मुंबईत राहिल्यामुळे इथल्या सुंदर परंपरांशी माझं नातं अधिक घट्ट झालं आहे. शहर रंगीबेरंगी रांगोळ्यांनी, घराबाहेर सजवलेल्या गुढ्यांनी आणि कुटुंबं एकत्र येऊन नववर्षाचं स्वागत करताना पाहणं मला खूप आवडतं. पुण्यात चित्रपटाचं शूटिंग करताना मला गुढीपाडवा ज्या ऊबदारपणे आणि खर्या भावनेने साजरा केला जातो, त्याचा अनुभव घेता आला आणि तो माझ्या मनात कायमचा राहिला. गुढीपाडवा साजरा करणाऱ्या सर्वांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा हा सण आनंद, समृद्धी आणि सुख घेऊन येवो.”
रजत वर्मा, जो ‘इत्ती सी खुशी’मध्ये विराटची भूमिका साकारतो, सांगतो “मुंबईत राहिल्यामुळे मला खरोखरच सणाचं वातावरण जाणवतं. घराबाहेर रंगीबेरंगी गुढ्या, प्रवेशद्वारावर रांगोळ्या आणि सकाळपासूनच परिसरात पसरलेला उत्सवी उत्साह हे सगळं पाहायला मिळतं. हळूहळू मी या छोट्या छोट्या गोष्टींचं महत्त्व आणि त्या दिवसाने आणलेली सकारात्मकता अधिक जाणायला लागलो. हा दिवस अनेक अर्थांनी नवी सुरुवात वाटतो. मी सर्वांना आनंदी गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो आणि हे नवं वर्ष भरपूर आनंद आणि चांगली ऊर्जा घेऊन येवो अशी आशा करतो.”