6 second read
0
0
19

no images were found

डीकेटीईत ‘ग्लॅमेक्स‘ फॅशन शो उत्साहात संपन्न

इचलकरंजी(प्रतिनिधी):येथील डीकेटीई इन्स्टिटयूट मध्ये झालेल्या ‘ग्लॅमेक्स’ फॅशन शो च्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कौशल्यपूर्ण आणि कलात्मक सादरीकरणांनी उपस्थितांची मने जिंकली. डीकेटीईमध्ये दरवर्षी होणारा फॅशन शो हा स्नेहसंमेलनाचा मुख्य आकर्षणबिंदू मानला जातो. विद्यार्थी कल्पकतेतून वेगवेगळया संकल्पना या कार्यक्रमात साकारतात. फॅशन शोमध्ये सहभागी झालेल्या संघानी वेगवेगळी संकल्पना घेवून विविध फॅशन वस्त्रप्रावरणे सादरीकरण केले. विविध प्रकारच्या पोशाखांमध्ये रॅम्पवर आत्मविश्‍वासाने वावरलेल्या विद्यार्थ्यानी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

संगीताच्या तालावर आणि रंगीबेरंगी प्रकाशयोजनेत सादर केलेल्या संकल्पनांनी सामाजिक, सांस्कृतिक तसेच अधुनिक विषयांचे प्रभावी दर्शन घडविले. या स्पर्धेत सर्पेट्स एलिगन्स, एलिट इलेव्हन व इजिप्शियन कल्चर या ग्रुपनी सहभाग घेतला होता तिन्ही ग्रुपनी नेत्रदीपक पारंपारिक पोशाख सादर करत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आणि परंपरेचे आकर्षक दर्शन घडविले.

सदर कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे,कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व ट्रस्टी यांचे मागदर्शन लाभले. संस्थेच्या संचालिका प्रा.डॉ.एल.एस.आडमुठे, डे. डायरेक्टर डॉ यु.जे.पाटील, सोशल डीन प्रा.एस.जी. कानिटकर, सोशल प्रमुुख प्रा.ए.व्ही. शहा, डॉ. ए.आर. बलवान व प्रा.ए.यु. अवसरे यांच्या हस्ते फॅशन शो चे उदघाटन झाले. डॉ.व्ही.के.ढंगे व सहकारी यांनी स्पर्धेचे संयोजन केले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Video
Comments are closed.

Check Also

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ सोशल मीडियावर सध्या एक वेगळाच चेहरा प्…