Home धार्मिक हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हुपरी येथील नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हुपरी येथील नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार !

4 second read
0
0
12

no images were found

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हुपरी येथील नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार ! हुपरी येथे १ मार्चला होणार्‍या हिंदु राष्ट्र-जागृती सभेसाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचा निर्धार !

हुपरी (प्रतिनिधी): – हिंदु समाजात जागृती होण्यासाठी, तसेच हिंदू समाजाचे संघटन होण्यासाठी हिंदु राष्ट्र-जागृती सभेची अत्यंत आवश्यकता आहे. या सभेच्या निमित्ताने हिंदुत्वाचे स्फुल्लींग चेतवले जाणार असल्याने १ मार्च या दिवशी हुपरी येथील हुतात्मा स्मारक येथे होणारी सभेसाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचा निर्धार हुपरी नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी केला. हुपरी येथील नुकत्याच झालेल्या निवडणुकीत नगरपरिषदेत निवडून आलेल्या नगरसेवकांचा सत्कार हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आला. त्या प्रसंगी हा निर्धार व्यक्त करण्यात आला. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या भित्तीपत्रकाचे अनावरण करण्यात आले.

या प्रसंगी नगराध्यक्ष श्री. मंगलराव माळगे, उपनगराध्यक्ष श्री. प्रकाशराव रणदिवे, हुपरीचे मुख्याध्याधिकारी श्री. अजय नरळे, विश्‍व हिंदु परिषद जिल्हासहमंत्री श्री. निळकंठ माने, बजरंग दलाचे श्री. प्रशांत साळुंखे, ‘कलादर्पण’चे संपादक श्री. संजय पाटील, भाजपचे श्री. मोहन वाईंगडे, हिंदू महासभेचे अखिल भारतीय उपाध्यक्ष श्री. रमेश भोरे, युनासेना शहरप्रमुख श्री. अजित उगळे, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे हातकणंगले तालुका संयोजक श्री. नितीन काकडे, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट, श्री. आदित्य शास्री यांसह २१ नगगरसेवक उपस्थित होते.

या प्रसंगी श्री. सुनील घनवट म्हणाले, ‘‘सध्या विविध माध्यमांतून हिंदु धर्म, देवता, राष्ट्रपुरुष यांच्यावर आघात होत आहेत. त्यासाठी हिंदूंनी संघटितपणे याला विरोध करणे आवश्यक आहे. त्यासाठीच सभा आहे.’’ या प्रसंगी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In धार्मिक
Comments are closed.

Check Also

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ सोशल मीडियावर सध्या एक वेगळाच चेहरा प्…