Home शासकीय हिंद – दी – चादर संदर्भात विभागीय माहिती कार्यालयात आढावा बैठक संपन्न

हिंद – दी – चादर संदर्भात विभागीय माहिती कार्यालयात आढावा बैठक संपन्न

2 second read
0
0
21

no images were found

हिंद – दी – चादर संदर्भात विभागीय माहिती कार्यालयात आढावा बैठक संपन्न

कोल्हापूर : हिंद दी चादर अर्थात श्री गुरु तेग बहादुर यांच्या 350 व्या शहिदी समागम शताब्दी वर्षानिमित्त , नवी मुंबई – खारघर या ठिकाणी 28 फेब्रुवारी व 1 मार्च रोजी कार्यक्रम संपन्न होत आहे .तिसऱ्या टप्प्यात संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमात कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश आहे येथील शीख , सिकलीकर , बंजारा, लबाना , मोहियाल ,सिंधी आणि इतर समाजाचा या कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविला जावा तसेच या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाच्या अनुषंगाने आढावा घेण्यासाठी आज विभागीय माहिती कार्यालय येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.
     प्रारंभी उपसंचालक प्रवीण टाके यांनी, ही बैठक आयोजित करण्यापाठीमागील भूमिका विशद केली . तर या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील बंजारा समाजाचे अनेक समाज बांधव मोठया प्रमाणावर सामील होणार असल्याची माहिती लखन पवार व रतन चव्हाण यांनी दिली . या बैठकीत वसंत नाईक हेही सहभागी झाले होते .या प्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, माहिती अधिकारी फारूक बागवान , सहाय्यक संचालक वृषाली पाटील , उपसंपादक रणजीत पवार आदी उपस्थित होते .

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय
Comments are closed.

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…