Home राजकीय विश्वास आणि खात्री असल्यानेच जनतेकडून पुन्हा एकदा महायुतीला कौल, खासदार धनंजय महाडिक..

विश्वास आणि खात्री असल्यानेच जनतेकडून पुन्हा एकदा महायुतीला कौल, खासदार धनंजय महाडिक..

0 second read
0
0
24

no images were found

विश्वास आणि खात्री असल्यानेच जनतेकडून पुन्हा एकदा महायुतीला कौल, खासदार धनंजय महाडिक..

कोल्हापूर (प्रतिनिधी):कोल्हापूर जिल्हा परिषदेवर महायुतीचा झेंडा फडकणार आहे. कोल्हापूर सह संपूर्ण राज्यात पुन्हा एकदा मतदार जनतेने भाजप आणि महायुतीवर विश्वास दाखवून, मिनी मंत्रालयाची सत्ता महायुतीकडे सोपवली आहे. काळाची पावलं ओळखून पायाभूत सुविधांचा विकास आणि समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा महायुती सरकारचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील महायुती सरकारने जनतेच्या मनात आढळस्थान निर्माण केले आहे. त्यामुळेच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत महायुतीला पुन्हा एकदा जनाधार मिळाला आहे. त्यामुळे जनता जनार्दनाचे मनस्वी धन्यवाद.. कोल्हापूर जिल्हा परिषदेत काँग्रेसच्या जागा घटल्या आहेत. त्यामुळे कोणी कितीही दावा केला तरी काँग्रेस जनतेच्या मनातून उतरली आहे, हे नक्की.पुढील काळात कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या कारभार पारदर्शी आणि वेगवान विकासाचा असेल याची ग्वाही देतो.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय
Comments are closed.

Check Also

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ सोशल मीडियावर सध्या एक वेगळाच चेहरा प्…