no images were found
कोल्हापूर महानगरपालिका : महापौरपद ओबीसीसाठी राखीव :विशाल शिराळे, विजय उर्फ ‘रिंकू’ देसाई, प्रमोद देसाई, वैभव कुंभार यांच्या नावांची चर्चा
कोल्हापूर(प्रतिनिधी): कोल्हापूर महानगरपालिकेचे महापौरपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव झाल्याने शहराच्या राजकारणात नवी समीकरणे जुळू लागली आहेत. सत्ताधारी भाजपमध्ये महापौरपदासाठी इच्छुकांची संख्या वाढली असून नूतन नगरसेवकांमध्ये चढाओढ रंगली आहे.
भाजपकडून विशाल शिराळे, विजय उर्फ रिंकू देसाई, प्रमोद देसाई आणि वैभव कुंभार ही चार नावे सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहेत. संघटनात्मक ताकद, मतदारसंघातील पकड, वरिष्ठ नेत्यांशी असलेले संबंध आणि सामाजिक समीकरणे या सर्व निकषांवर संभाव्य उमेदवारांची कसोटी सुरू आहे.
महापौरपद ओबीसीसाठी राखीव झाल्याने भाजपला सामाजिक समतोल साधण्याची संधी मिळाली असली तरी, अंतर्गत स्पर्धा पक्ष नेतृत्वासाठी आव्हान ठरण्याची शक्यता आहे. महायुतीतील समन्वय, गटबाजी टाळण्याची रणनीती आणि अंतिम निर्णय कोणाच्या बाजूने झुकतो याकडे शहराचे लक्ष लागले आहे.महापौरपदाच्या शर्यतीत कोण बाजी मारणार, याचा फैसला पक्षश्रेष्ठींच्या निर्णयावर अवलंबून असून, येत्या काही दिवसांत कोल्हापूरच्या राजकारणात हालचालींना वेग येणार.