Home शासकीय ‘डॅना इंडिया’ची देशातील जलस्रोत पुन्हा जिवंत करण्यासाठी 4.5 कोटींची गुंतवणूक 

‘डॅना इंडिया’ची देशातील जलस्रोत पुन्हा जिवंत करण्यासाठी 4.5 कोटींची गुंतवणूक 

0 second read
0
0
276

no images were found

‘डॅना इंडिया’ची देशातील जलस्रोत पुन्हा जिवंत करण्यासाठी 4.5 कोटींची गुंतवणूक

कोल्हापूर :   प्रकाशासाठी तसेच मध्यम व अवजड वाहनांसाठी पारंपरिक व विद्युत प्रणालींच्या क्षेत्रातील ‘डॅना’  या जागतिक स्तरावरील आघाडीच्या कंपनीने, भारतातील जलाशयांची दुरुस्ती, पुनरुज्जीवन व पुनर्वसन करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, महाराष्ट्र, उत्तरप्रदेश व गुजरात या राज्यांतील सात जलाशयांचे पुनरुज्जीवन केले आहे.
हे केवळ तलावांचे पुनरुज्जीवन आहे असे वाटू शकेल पण त्याचा प्रभाव पर्यावरणाच्या विविध अंगांवर पडतो तसेच विशेषत: ग्रामीण भागाता राहणाऱ्या जलाशयांवर अवलंबून समुदायांच्या आयुष्यामध्ये यामुळे खूप बदल घडतो. खेड्यांमध्ये जलसंवर्धनाचे काम करण्यात, जलाशयाची पाणी साठवण्याची क्षमता वाढवण्यात, कृषी/फलोत्पादनाची उत्पादनक्षमता सुधारण्यात हे प्रकल्प मध्यवर्ती भूमिका बजावतात. ही संसाधनांच्या शाश्वत व्यवस्थापनासाठी सहाय्यकारी प्रणाली ठरत आहे.
“2,73,750 क्युबिक मीटर एवढी पुनर्भरण क्षमता असलेल्या सात जलाशयांचे पुनरुज्जीवन करून आम्ही 16,200 जणांच्या आयुष्यांत बदल घडवून आणला आहे. डॅनाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सर्व प्रदेशांत हे काम करण्याची आमची योजना आहे आणि जलाशयांच्या पुनरुज्जीवनासाठी कंपनीने सुमारे 4.5 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे,”
असे ‘डॅना इंडिया’चे एचआर प्रमुख सुनील यांनी सांगितले.
स्थानिक ग्रामपंचायती, सरकारी अधिकारी, समुदायातील सदस्य, प्रभावी नागरिक आणि स्थानिक कार्यकर्ते अशा विविध संबंधितांशी सहयोग करून प्रकल्प अखंडितपणे चालत राहील याची खातरजमा कंपनी करत आहे.
स्वच्छ पाण्याची उपलब्धता हा मुद्दा जगभरातील आर्थिक उपक्रम, विकास व व्यवसायांवर परिणाम करणाऱ्या महत्त्वाच्या मुद्दयांपैकी एक म्हणून पुढे आला आहे. वारंवार येणारे दुष्काळ व पूर यांमुळे मोठ्या प्रमाणात स्थलांतरे होत आहेत, समुदाय त्यांच्या मूळ भूमीपासून दूर जात आहेत. “जलसंवर्धनात गुंतवणूक केल्यामुळे जलस्रोतांवरील ताण तर कमी होईलच, शिवाय, ग्रामीण समुदायांना याचा लाभ होईल,” असेही ते म्हणाले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

‘आर्यन्स सन्मान चित्रपट-नाटक २०२५’ पुरस्कार सोहळ्याची घोषणा…

‘आर्यन्स सन्मान चित्रपट-नाटक २०२५’ पुरस्कार सोहळ्याची घोषणा…   नवीन वर्षा…