no images were found
अभिनेता निर्भय वाधवा असुराच्या भूमिकेत दिसणार
सोनी सबवरील ‘गाथा शिव परिवार की – गणेश कार्तिकेय’ या मालिकेच्या माध्यमातून शिव, पार्वती आणि त्यांची मुले गणेश आणि कार्तिकेय या समस्त शिव परिवाराच्या फारशा माहीत नसलेल्या कथा लोकांपर्यंत पोहोचत आहेत. प्रत्येक कथेनंतर या मालिकेचे आध्यात्मिक विश्व विस्तारत आहे. धर्म आणि अधर्मातील युद्ध, भावनांचा प्रवास आणि दैवी उद्देश यांची एकत्र गुंफलेली ही कथा आहे.
‘गणेश कार्तिकेय’ मालिका आता एका उत्कट अध्यायात प्रवेश करत आहे. तुळशीने शाप दिल्यानंतर गणेशाने देखील तिला दिलेल्या शापाचा एक भाग म्हणून सिंधुरासुर या दैत्याचे तुळशीशी लग्न नक्की होते. यापूर्वी अनेक पौराणिक भूमिका करणारा अभिनेता निर्भय वाधवा या असुराच्या भूमिकेत दिसणार आहे. जन्मतःच नकोसा असलेला आणि प्रेमापासून वंचित राहिलेला सिंधूरासुर पुढे एक भयंकर असुर बनतो. त्याच्या आगमनामुळे कथानकात एक गडद आणि नाट्यमय ऊर्जा आली आहे. त्याच्या व्यक्तिरेखेमुळे कथेला एक भावनिक खोली आणि वजन प्राप्त झाले आहे. या कथेमधून नियती, क्रोध आणि ताकद यांची गुंतागुंत दिसते.
सिंधुरासुराची भूमिका करत असलेला निर्भय वाधवा म्हणतो, “मी जेव्हा पहिल्यांदा सिंधुरासुराविषयी वाचले, तेव्हा मला हे प्रकर्षाने जाणवले ही याची कहाणी खूप वेगळ्या प्रकारे सुरू होत आहे. ताकदीने नाही, तर वेदनेमधून तिची सुरुवात आहे. तो फक्त एक असुर नाही; नकार आणि नको असण्याच्या भावनेतून तो घडला आहे. या भावनिक करणामुळे इतर खलनायकांपेक्षा त्याच्या स्वभावात अधिक गुंतागुंत आहे. एक अवजड चिलखत घालून माझे पहिले दृश्य चित्रित करण्याची आठवण माझ्या मनात आजही ताजी आहे. त्यावेळी दिग्दर्शकाने मला सांगितले होते, “त्याला जे जे नाकारण्यात आले आहे, त्या ओझ्याचा अनुभव घे.’ त्याक्षणी मला सिंधूरासुर समजला. सिंधूरासुर केवळ क्रोध किंवा ताकद दाखवत नाही, तर आयुष्यभर बाळगलेले एक दुखावलेपण त्याच्यात आहे, ज्याचा स्फोट होऊन त्याचे दहशतीत रूपांतर होते. मी आजवर केलेल्या भूमिकांपैकी अत्यंत गुंतगुंतीची अशी ही व्यक्तिरेखा आहे. त्याच्या आगमनामुळे संपूर्ण कथानकाची लय कशी बदलते याचा अनुभव प्रेक्षक घेतील.”