Home मनोरंजन भगवान शंकराच्या भूमिकेत दिसणार अविनेश रेखी

भगवान शंकराच्या भूमिकेत दिसणार अविनेश रेखी

6 second read
0
0
32

no images were found

भगवान शंकराच्या भूमिकेत दिसणार अविनेश रेखी

 सोनी सबवरील ‘गाथा शिव परिवार की – गणेश कार्तिकेय’ ही पौराणिक मालिका भगवान शिवाच्या दिव्य परिवाराचे हृदयस्पर्शी चित्रण करून प्रेक्षकांचे मन जिंकत आहे. ही मालिका श्रद्धा आणि मूल्ये यांच्या कालातीत कथा सादर करते आणि ब्रह्मांडातील पहिल्या कुटुंबाच्या कहाण्या अशा दृष्टिकोनातून सादर करते, की त्या प्रेक्षकांना आपल्याशा वाटतात.

या लोकप्रिय मालिकेला नवीन परिमाण देण्यासाठी सुपरिचित अभिनेता अविनेश रेखी आता शंकराच्या भूमिकेत दाखल होत आहे. या भव्य-दिव्य व्यक्तिरेखेतील बारकावे साकार करण्याचा त्याचा प्रयत्न असेल. जबरदस्त स्क्रीन प्रेझेन्स आणि भावनिक गहिरेपण याबद्दल ओळखला जाणारा अविनेश शंकराच्या भूमिकेत शक्ती आणि अथांग शांतता यांचा समतोल घेऊन येत आहे. आपल्या अनोख्या शैलीने तो मालिकेचे कथानक नक्कीच अधिक समृद्ध करेल.

या मालिकेत दाखल होण्याबद्दल अविनाश रेखी म्हणतो , “भगवान शंकराची भूमिका करणे हा गौरव आहे, तशीच एक जबाबदारीही आहे. या भूमिकेत प्रचंड गहनता आहे आणि भावनिक लक्षणीयता असून शंकराबद्दल कोट्यावधी लोकांच्या मनात पूज्य भाव आहे. या भूमिकेची तयारी करताना हा विचार सतत माझ्या मनात आहे. एक अभिनेता म्हणून, या दिव्य व्यक्तिरेखेत माझे स्वतःचे वेगळेपणे घेऊन येण्यासाठी मी उत्सुक आहे. शंकराच्या व्यक्तिमत्त्वात ज्या भावना, तत्वज्ञान आणि आंतरिक शांतता आहे, ते सारे अभिनयातून टिपण्याचा माझा प्रयत्न असेल. प्रेक्षकांना शंकराच्या शांतीमागची गहनता, कृतीमधील प्रबुद्धता आणि आपला परिवार आणि भक्तमंडळी यांच्याप्रती असलेले प्रेम अनुभवता आले पाहिजे. या मालिकेच्या टीमने माझ्यावर खूप विश्वास दाखवला आहे, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. भगवान शिवाचा प्रवास आणि मूल्ये यांच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संलग्न होण्यास मी खरोखर आतुर आहे.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन
Comments are closed.

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…