no images were found
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याचे काम ८० टक्के पूर्ण
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याचे काम ८० टक्के पूर्ण झाले असून येत्या मार्च अखेरपर्यंत बोगद्याची एक लेन वाहतुकीसाठी खुली होणार आहे. सध्या बोगद्याचे जोड रस्ते आणि अंतर्गत रस्त्याचे काम शिल्लक असून, अल्पावधीत हे काम पूर्ण करून मुंबईकरांसाठी कशेडी बोगदा उन्हाळ्यापर्यंत खुला होईल. यामुळे कशेडी घाट अवघ्या ४५ मिनिटांत पार होईल तर रत्नागिरी रायगड जिल्ह्याशी अवघ्या दीड मिनिटात जोडला जाईल. तब्बल ४४१ कोटी रुपयांचा हा प्रकल्प मुंबई-गोवा महामार्गावरील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असून रत्नागिरी जिल्ह्यासह चाकरमान्यांना यामुळे मुंबई अधिक जवळ येणार येईल.