no images were found
शिवाजी विद्यापीठमध्ये १ते ७ नोव्हेंबर अत्याधुनिक विश्लेषणात्मक कार्यशाळा
APPES प्रदर्शित करणारा भारत हा जगातील सहावा तर उच्च दाबाच्या परिस्थितीत UVPES प्रदर्शित करणारा एकमेव देश स्तुती कार्यक्रमांतर्गत एनसीएल पुणे चे वैज्ञानिक डॉ. सी एस गोपीनाथ यांचे वक्तव्य
पदार्थांच्या विविध गुणधर्मांचा अभ्यास करून त्याची उपयुक्तता ठरवण्यासाठी अल्ट्रा व्हायोलेट स्पेक्ट्रोस्कॉपी उपयुक्त : प्रा. डेळेकर
शिवाजी विद्यापीठाच्या सैफ डीएसटी सीएफसी विभागामध्ये १ नोव्हेंबर ते ७ नोव्हेंबर अत्याधुनिक विश्लेषणात्मक कार्यशाळेमध्ये दिनांक ६ नोव्हेंबर रोजी बारावे पुष्प गुंफण्यासाठी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा(NCL), पुणे चे वैज्ञानिक डॉ. सी एस गोपीनाथ सरांचे एक्सपीएस या उपकरणाबद्दल नवोदित संशोकांना मार्गदर्शन लाभले.
द्वितीय सत्रामध्ये शिवाजी विद्यापीठाचे रसायनशास्त्र विभागाचे प्रा. एस. डी. डेळेकर यांनी अल्ट्रा-व्हायोलेट स्पेक्ट्रोस्कॉपी या विषयी सखोल मार्गदर्शन नवोदित संशोधकांना केले. या उपकरणाच्या माध्यमातून आपण पदार्थाचे किंवा ननो-पदार्थाचे विविध गुणधर्मांचा अभ्यास करून सदर पदार्थाची उपयुक्तता कशासाठी आहे, याविषयी सविस्तर माहिती दिली.
व्याख्यानमाला आयोजनासाठी प्रतिभाषाली दोन्ही सत्रांमध्ये अत्यंत कुशल व्यक्तिमत्व प्रा. सोनकवडे सरांच्या मार्गदर्शनाखाली स्तुति टीमचे योगदान लाभले.
दुपारच्या सत्रामध्ये सहभागी विद्यार्थ्यांना स्तुति अंतर्गत शैक्षणिक सहल म्हणुन किल्ले पन्हाळाची सफर घडविली. तेथे शिवाजी विद्यापीठाच्या पदार्थ विज्ञान विभागाच्या अखत्यारीत असणार्या अवकाश संशोधन केंद्राला भेट दिली. तेथे अत्याधुनिक दुर्बिणीद्वारे अवकाश निरीक्षण केले. आकाशातील ताऱ्यांचा खेळ अनुभवण्याची अनोखी संधी सहभागींना मिळाली तसेच सर्वांनी पन्हाळ्यावरील जैवविविधतेचा आनंद घेतला.
या प्रशिक्षण कार्यक्रमामुळे पुन्हा पूर्वीचे कॉलेजचे दिवस आठवले असे म्हणून सहभागींनी भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे आणि कोल्हापूर विद्यापीठाचे मनापासून आभार मानले.