no images were found
दिवाळीत आरोग्यदायी आहाराचे महत्त्व
आनंदासोबत आरोग्याचा उत्सव – स्वाती अवस्थी, मुख्य आहारतज्ज्ञ, वोक्हार्ट हॉस्पिटल्स, नागपूर
दीवाळी म्हणजे प्रकाशाचा सण, पण हा सण फक्त दिवे, फटाके आणि सजावटीपुरताच मर्यादित नाही, तर विविध स्वादिष्ट पदार्थांसह प्रेम आणि आनंद वाटण्याचा सण आहे. मिठाई, तळलेले पदार्थ आणि स्वादिष्ट जेवण हे या सणाचा महत्त्वाचा भाग आहेत. पण या उत्साहात जास्त खाल्ल्यामुळे आम्लता, अपचन आणि वजन वाढणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. या दीवाळीत, वोक्हार्ट हॉस्पिटल्स, नागपूरच्या मुख्य आहारतज्ज्ञ स्वाती अवस्थी यांनी स्वाद आणि आनंद कायम ठेवत आरोग्यदायी पद्धतीने दीवाळी साजरी करण्यासाठी काही उपयुक्त टिप्स शेअर केल्या आहेत.
संतुलन सर्वात महत्त्वाचे
मुख्य आहारतज्ज्ञ स्वाती अवस्थी म्हणतात, “सणासुदीच्या खाण्यात लाडू किंवा समोसा खाणं सोडून द्यायचा नाही, फक्त ते योग्य प्रमाणात खायचा.” योग्य प्रमाणात खाल्ल्याने तुम्ही सणातील सर्व गोड आणि स्वादिष्ट पदार्थांचा आनंद घेऊ शकता आणि तुमचं आरोग्यही टिकवू शकता.
स्मार्ट खाण्याच्या टिप्स
- तळलेले पदार्थ टाळा- डीप-फ्रायड स्नॅक्सच्या ऐवजी बेक केलेली मठरी, खाकरे किंवा भाजलेला चिवडा खा. “बेक केलेल्या समोश्याचा स्वाद तोच असतो, फक्त तेल कमी असते.”
- आरोग्यदायी मिठाई निवडा – साखरेच्या मिठाई ऐवजी गूळ, खजूर, अंजीर आणि सुका मेवा पासून बनवलेली मिठाई खा.
- बदाम, अक्रोड, जवस आणि भोपळ्याच्या बिया यांचा समावेश करा. हे स्वाद आणि पोषण दोन्ही वाढवतात.
- भरपूर पाणी आणि हर्बल टी प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि जास्त खाण्यापासून बचाव होतो.
- सॅलड, फळे, उसळ (स्प्राऊट्स ) आणि हलके जेवण ताटात असू द्या. जेणेकरून सणाचा आनंद घेताना संतुलन टिकेल
“तुमचे ताट रंगोळीप्रमाणे रंगीबेरंगी आणि पोषक बनवा.”
सजगपणे खाण्याचा सल्ला
दिवाळीच्या पार्टीत गेट-टुगेदरमध्ये गप्पा मारताना किंवा टीव्ही पाहताना जास्त खाल्ले जाते. त्यामुळे बसून, हळूहळू आणि प्रत्येक घासाचा आनंद घेत खाण्याचा सराव करा. याने पचन सुधारते आणि जास्त खाण्यापासून बचाव होतो.
व्यायामालाही स्थान द्या
सणात व्यायामाला विसरू नका. सकाळी चालणे, हलके योगासन किंवा सणाच्या वेळी नाचणे या गोष्टींमुळे ऊर्जाआणि फिटनेस टिकून राहते. त्यामुळे दीवाळी अधिक उत्साही आणि आनंददायी होते.
आरोग्यदायी भेटवस्तूंची नवी परंपरा
या दीवाळीत नवीन परंपरा सुरू करा – मिठाईच्या डब्यांच्या ऐवजी सुका मेवा, हर्बल टी किंवा औषधी वनस्पतींची झाडे भेट द्या. ही अशी भेट असेल जी आरोग्य आणि आनंद दोन्ही देईल.
सणाचा खरा अर्थ
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा अंधारावर आणि चांगुलपणाचा वाईटावर विजयाचे प्रतीक आहे. यंदा आरोग्याचा आजारावर आणि सजग खाण्याचा अनियंत्रित खाण्यावर विजय साजरा करूया. आनंद, प्रेम आणि आरोग्यासह दीवाळी साजरी करा कारण खरा सण तोच जो चांगल्या आरोग्यासह साजरा केला जातो. “या दिवाळीत तुमचं घर दिव्यांनी उजळू दे, मन आनंदाने भरू दे आणि ताट आरोग्याने सजू दे,” असा संदेश स्वाती अवस्थी यांनी दिला.