Home मनोरंजन सुंबुल खान आणि नेहा मेहताच्या व्यक्तिरेखांमध्ये संघर्ष; कुटुंब दोन भागांमध्ये विभागले

सुंबुल खान आणि नेहा मेहताच्या व्यक्तिरेखांमध्ये संघर्ष; कुटुंब दोन भागांमध्ये विभागले

8 second read
0
0
38

no images were found

सुंबुल खान आणि नेहा मेहताच्या व्यक्तिरेखांमध्ये संघर्ष; कुटुंब दोन भागांमध्ये विभागले

 सोनी सबवरील ‘इत्ती सी खुशी’ मालिकेचे भावनांचे नानाविध स्तर उलगडून दाखवणारे कथानक आणि कौटुंबिक नाती यांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. ही अन्विता (सुंबुल तौकीर खान) या तरुणीची कहाणी आहे, जी आपल्या विस्कळित कुटुंबाला सावरण्याची जबाबदारी निभावते आहे. अनेक वर्षे गायब राहिल्यानंतर तिची आई हेतल (नेहा SK मेहता) आता अचानक परत आल्यामुळे कुटुंबाची शांतता गढूळली आहे. जुन्या जखमा पुन्हा वाहू लागल्या आहेत आणि अन्विताने जिवापाड जपलेली नाती तिच्या हातून निसटू लागली आहेत. अलीकडच्या भागांमध्ये, प्रेक्षकांनी पाहिले की, अन्विताचे जीवन हा भावनांचा चक्रवात झाला आहे. व्यसनी वडिलांशी म्हणजे सुहासशी (वरुण बडोला) झगडण्यापासून ते विराट (रजत वर्मा)ने लपवलेले सत्य पचवण्यापर्यंत विविध अडचणी तिच्या मार्गात आहेत. त्यात आता घरात एक नवीन समस्या उभी राहिली आहे. हेतल आपल्या गोड बोलण्याने जिंकून घेण्याचा प्रयत्न करत आहे, तर अन्विताला मात्र तिचा हा आपलेपणा खोटा असल्याचा दाट संशय आहे. आपल्या आईच्या हेतूंबद्दल ती साशंक आहे. हेतलचे वागणे, तिची प्रत्येक कृती अन्विताला खोटी वाटते. पण घरातील इतरांना मात्र आपल्या आईचे हे अस्सल प्रेम वाटते.

आगामी भागांमध्ये, आई आणि मुलीमधील दरी आणखी वाढत जाताना दिसेल. हेतलच्या खोटेपणावरून झालेल्या बोलाचालीत अन्विताला काही क्लेशदायक गोष्टी समजतात, पण जेव्हा तिची धाकटी भावंडे आपल्या आईची बाजू घेतात, तिला दुसरी संधी देण्याची गोष्ट करतात, तेव्हा परिस्थिती आपल्या हातून निसटत असल्याचा आभास अन्विताला होतो. आपला आतला आवाज आणि भावंडांचा आईवरील विश्वास यामध्ये अन्विता खूप एकटी आणि एकाकी झाली आहे.

आईबद्दल संशय घेणाऱ्या अन्विताला आपल्या भावंडांचा विश्वास गमवावा लागणार का? की अधिक उशीर होण्याआधी हेतलचा खरा चेहरा सगळ्यांसमोर येणार?

‘इत्ती सी खुशी’ मालिकेत अन्विताची भूमिका करणारी सुंबुल तौकीर खान म्हणते, “अन्विताच्या जीवनातील हा टप्पा माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे. अन्विता आत्ता प्रेम आणि अविश्वास यांच्या धूसर रेषेवर उभी आहे. आपल्या प्रिय व्यक्तीवर विश्वास ठेवावासा वाटत असताना त्या व्यक्तीच्या कृती मात्र त्या विश्वासाला पात्र नाहीत हे तिला दिसत आहे. अन्वितासाठी ही द्विधा स्थिती केवळ आपल्या आईच्या बाबतीत नाही; कुटुंब म्हणजे नक्की काय हा विचारही तिला सतावत आहे. हे क्षण भावनांचे ओझे घेऊन येतात पण हे देखील दाखवतात की, प्रेम आणि क्लेश कसे एकत्र असू शकतात.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

कोल्हापुरातील तरुणाईच्या उज्वल भविष्याचे स्वप्न साकार होणार- आमदार अमल महाडिक

कोल्हापुरातील तरुणाईच्या उज्वल भविष्याचे स्वप्न साकार होणार- आमदार अमल महाडिक कोल्हापूर : …