Home उद्योग शॉपर्स स्टॉप साजरा करत आहे सीझन ऑफ गिफ्टिंग तान्या मानिकताला यांच्या हृदयस्पर्शी ‘गिफ्ट ऑफ लव्ह’ दिवाली फिल्मसह

शॉपर्स स्टॉप साजरा करत आहे सीझन ऑफ गिफ्टिंग तान्या मानिकताला यांच्या हृदयस्पर्शी ‘गिफ्ट ऑफ लव्ह’ दिवाली फिल्मसह

17 second read
0
0
103

no images were found

शॉपर्स स्टॉप साजरा करत आहे सीझन ऑफ गिफ्टिंग
तान्या मानिकताला यांच्या हृदयस्पर्शी ‘गिफ्ट ऑफ लव्ह’ दिवाली फिल्मसह

कोल्हापूर,  : शॉपर्स स्टॉप या भारतातील आघाडीच्या फॅशन आणि ब्युटी डेस्टिनेशनने दिवाळीसाठी नवी फिल्म – गिफ्ट ऑफ लव्ह लाँच केली असून त्यात प्रसिद्ध ओटीटी अभिनेत्री तान्या मानिकताला झळकणार आहे. या कॅम्पेनच्या माध्यमातून भेट देण्याघेण्याचा आनंद साजरा केला जाणार आहे व विचारपूर्वक निवडलेले गिफ्ट्स कशाप्रकारे प्रेम व्यक्त करतात हे यात पाहायला मिळणार आहे.

        या फिल्ममधे तान्याचा शॉपर्स स्टॉप स्टोअरमधला खेळकर, सहज वावर आणि सोबत विविध प्रकारचे कपडे, हँडबॅगपासून परफ्युम्स ते एथनिक वेयर्सपर्यंत ती स्पर्श करते, ते प्रत्येक उत्पादन तिच्या जवळच्यांसाठी प्रेमाचं प्रतीक बनतं. तिची उत्साही उर्जा स्टाइल आणि भावना यांचा मेळ घालणाऱ्या याच्या गोष्टीला साजेशी आणि मनाचा कौल घेऊन निवडलेले गिफ्ट्स सर्वोत्तम असतात याची आठवण करून देणारे आहे.

       फिल्म स्टोअरमधून घरी सुरू असलेल्या सेलिब्रेशनकडे जाते, तसे तिने निवडलेले प्रत्येक गिफ्ट योग्य आणि कुटुंबातल्या प्रत्येकाला मनापासून आनंद देणारे ठरते. गिफ्ट्सच्या त्या देण्याघेण्यातून ब्रँडने सोपे सत्य अधोरेखित केले आहे आणि ते म्हणजे, गिफ्ट ही केवळ तुम्ही खरेदी केलेली वस्तू नसते, तर त्यापलीकडे असलेली भावना असते.दिवाळीसारख्या सणाच्या काळात भावना केंद्रस्थानी असल्याच्या संकल्पनेवर आधारित गिफ्ट्स ऑफ लव्ह हे कॅम्पेन विचारपूर्वक निवडलेल्या गिफ्ट्सद्वारे प्रेम व्यक्त करण्याचा आनंद साजरा करणारं आहे. तुमची प्रत्येक निवड, प्रियजनांना तुम्ही किती जवळून ओळखता ते दर्शवणारी असते.

        ‘गिफ्टचे खरे मूल्य त्यामागे असलेल्या भावनेत दडलेले असते असे शॉपर्स स्टॉपला वाटते,’ असे शॉपर्स स्टॉपचे कस्टमर केयर असोसिएट आणि प्रमुख मार्केटिंग अधिकारी श्री. जितेन महेंद्र म्हणाले. अर्थपूर्ण भेटवस्तू अंदाजे घेतलेली नसते, तर विचारपूर्वक जाणिवेतून निवडलेली असते, याची आठवण ‘गिफ्ट ऑफ लव्ह’ आपल्याला करून देणार आहे. आपल्या प्रियजनांना खरंच काय आवडेल हे माहीत असतं, तेव्हा प्रत्येक गिफ्ट प्रेम, काळजी आणि कनेक्शन यांचे प्रतिबिंब ठरते.

        प्रीमियमायझेशन धोरणाचा एक भाग म्हणून शॉपर्स स्टॉप कपडे, हँडबॅग्ज, घड्याळं, फ्रेगरन्सेस, सौंदर्य, स्किनकेयर, होम डेकोर अशा विभागातील ५००+ प्रीमियम ब्रँड्ससह सणांच्या खरेदीचा आनंद उंचावत राहणार आहे. भारतातील चोखंदळ ग्राहकांसाठी ते दिवाळी खरेदीचे डेस्टिनेशन बनत आहे.खरेदी शॉपमधे किंवा ऑनलाइन करत असताना शॉपर्स स्टॉपच्या पर्सनल शॉपर सर्व्हिसच्या मदतीने खरेदीचा वैयक्तिक आवडीनुसार अनुभव घेता येतो. त्याशिवाय बहुमाध्यमिक विस्तार, विचारपूर्वक निवडण्यात आलेली गिफ्ट्स प्रत्येक खरेदी अर्थपूर्ण बनवतात.

         या दिवाळीत शॉपर्स स्टॉप ग्राहकांना मनाचा कल ओळखून गिफ्ट निवडण्याचा आनंद साजरा करण्यासाठी व प्रत्येक क्षण खास करण्यासाठी आमंत्रित करत आहे. तुम्हाला खरेदी ऑनलाइन करायची असो किंवा इन- स्टोअर शॉपर्स स्टॉपद्वारे खरेदीचा अनोखा अनुभव मिळणार आहे. तुमच्या जवळच्या स्टोअरला भेट द्या किंवा लेटेस्ट कलेक्शन व एक्सक्लुसिव्ह ऑफर्सचा www.shoppersstop.com. वर ऑनलाइन लाभ घ्या.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In उद्योग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात १३ व १४ मार्च रोजी राज्यशास्त्र परिषदेचे ३१ वे अधिवेशन आणि राष्ट्रीय चर्चासत्र :’राज्यशास्त्रातील नवीन प्रवाह’ यावर होणार विचार मंथन

शिवाजी विद्यापीठात १३ व १४ मार्च रोजी राज्यशास्त्र परिषदेचे ३१ वे अधिवेशन आणि राष्ट्रीय चर…