Home राजकीय पंतप्रधानांच्या स्वदेशी जागर अभियानाच्या प्रसारासाठी खासदार धनंजय महाडिक यांची राजारामपुरीत पदयात्रा

पंतप्रधानांच्या स्वदेशी जागर अभियानाच्या प्रसारासाठी खासदार धनंजय महाडिक यांची राजारामपुरीत पदयात्रा

8 second read
0
0
74

no images were found

पंतप्रधानांच्या स्वदेशी जागर अभियानाच्या प्रसारासाठी खासदार धनंजय महाडिक यांची राजारामपुरीत पदयात्रा

कोल्हापूर (प्रतिनिधी): देशाची आर्थिक प्रगती आणि स्थानिक उत्पादकांना चालना देण्यासाठी, प्रधानमंत्री मोदी यांनी जाहीर केलेल्या स्वदेशी वापराच्या संकल्पाला सर्वांनी साथ द्या, असे आवाहन खासदार महाडिक यांनी केले. त्यासाठी कोल्हापूर शहरातील राजारामपुरी परिसरात स्वदेशी जागर अभियान उपक्रमांतर्गत, पदयात्रा काढण्यात आली. दरम्यान सर्व दुकानदार आणि व्यापार्‍यांनी स्वदेशी अभियानात सहभागी होण्याची ग्वाही दिली.

     पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, जीएसटीमध्ये मोठी कपात करून, देशाचे अर्थचक्र गतीमान केले आहे. त्यातून सुमारे ४०० जीवनावश्यक वस्तू चांगल्याच स्वस्त झाल्या आहेत. दुसरीकडे पंतप्रधान मोदी यांनी स्वदेशीचा नारा दिला आहे. सर्व देशवासीयांनी स्वदेशी उत्पादनांचा वापर करावा, असे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे. हा संकल्प जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी, खासदार धनंजय महाडिक यांनी राजारामपुरी परिसरात पदयात्रा काढली. राजारामपुरीतील अग्नेय मुखी हनुमान मंदिरापासून या पदयात्रेला प्रारंभ झाला. सुजाता मेडिकल्स, रेमंड शॉप, जन औषधी मेडिकल, जयराज पेट्स,  पुरोहित स्वीट, रियल चॉईस, टायझर, कारेकर सराफ, स्पाइस, डी कॉट यासह विविध दुकानात जाऊन, खासदार महाडिक यांनी व्यापारी वर्गाशी संवाद साधला. जीएसटी कपातीमुळे व्यवसायात वाढ होणार आहे. आता स्वदेशी वस्तूंचा वापर करून, देशाला आर्थिकदृष्टया अधिक सक्षम बनवूया, असे आवाहन खासदार महाडिक यांनी केले आहे. राजारामपुरी परिसरातील सर्व व्यापार्‍यांनी खासदार महाडिक यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, गेल्या ११ वर्षात पंतप्रधान मोदी यांनी देशहिताचे अनेक निर्णय घेतले. आता स्वदेशी अभियान सुध्दा यशस्वी करू, अशी ग्वाही दिली. नवरात्राच्या काळात सध्या भक्तीचा जागर सुरू आहे. अशावेळी खासदार महाडिक यांनी स्वदेशी जागर अभियान राबवून, एकप्रकारे राष्ट्र हिताचा जागर सुरू केल्याबद्दल व्यापार्‍यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव, रूपाराणी निकम, रहिम सनदी यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

डिजिटल अध्यापनासाठी प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण

डिजिटल अध्यापनासाठी प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण        &n…