no images were found
महापालिकेच्यावतीने पी.एम.स्वनिधी लोककल्याण मेळावा व प्रशिक्षणाचे आयोजन
कोल्हापूर (प्रतिनिधी) : केंद्र शासन पुरस्कृत पी.एम.स्वनिधी योजनेची पुनर्रचना झाली असून महानगपालिकेच्या पी.एम.स्वनिधी योजनेअंतर्गत दि.१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर २०२५ पर्यंत लोक कल्याण मेळावाचे आयोजन करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. यामध्ये पी.एम.स्वनिधी योजनेची जाणीव जागृती, नवीन कर्ज प्रकरणे, दुसऱ्या व तिसऱ्या कर्ज टप्प्यातील कर्ज प्रकरणांना मंजुरी, स्वनिधी से समृद्धी इत्यादी लाभ देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच खाद्य पदार्थाशी निगडीत पी.एम.स्वनिधी लाभार्थी, पथविक्रेते यांच्यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पात्र लाभार्थ्यांना प्रथम कर्ज टप्पा रक्कम रु.१५,०००/- दुसरा टप्पा २५,०००/- व तिसरा टप्पा ५०,०००/- दिले जाणार आहे. कर्जप्राप्त पथविक्रेता व त्यांच्या कुटुंबाचे सामाजिक आर्थिक प्रोफायलिंग होऊन त्यापैकी पात्र लाभार्थ्यांना या शासकीय योजनेचा लाभ दिला जाणार आहे. यामध्ये पी.एम.जीवन ज्योती बीमा योजना, पी.एम. सुरक्षा बीमा योजना, पी.एम.जनधन योजना, पीएम.श्रमयोगी मानधन, रजिस्ट्रेशन अंडर BOCW, वन नेशन वन रेशन कार्ड, पी.एम.मातृवंदना योजना व जननी सुरक्षा योजनांचा समावेश आहे.
तरी शहरातील सर्व पथविक्रेत्यांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा. तसेच दि.१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर २०२५ पर्यंत शाहूपुरी येथील शहर उपजीविका केंद्र व छत्रपती शिवाजी मार्केट येथील दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (DAY-NULM) कक्षास भेट देवून या योजनेचा लाभ घ्यावा. त्याचप्रमाणे दि.२९ सप्टेंबर २०२५ रोजी शाहू स्मारक सभागृहात सकाळी ११.०० ते २.०० या वेळेत लोक कल्याण मेळावा व अन्न सुरक्षा प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी खाद्य पदार्थ व फळ भाजीपाला संबधित फेरीवाल्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी केले आहे.