Home मनोरंजन आता नेटफ्लिक्‍सवर पहा ‘इन्‍स्‍पेक्‍टर झेंडे’, पोलिस, ज्‍याने स्विमसूट किलरवर दोनदा मात केली 

आता नेटफ्लिक्‍सवर पहा ‘इन्‍स्‍पेक्‍टर झेंडे’, पोलिस, ज्‍याने स्विमसूट किलरवर दोनदा मात केली 

59 second read
0
0
69

no images were found

आता नेटफ्लिक्‍सवर पहा ‘इन्‍स्‍पेक्‍टर झेंडे’, पोलिस, ज्‍याने स्विमसूट किलरवर दोनदा मात केली 

सत्‍य घटनेमधून प्रेरित चित्रपट ‘इन्‍स्‍पेक्‍टर झेंडे’चे लेखन व दिग्‍दर्शन चिन्‍मय मांडलेकर यांनी केले आहे आणि जय शेवक्रमणी व ओम राऊत निर्माते आहेत. पहा हा चित्रपट ५ सप्‍टेंबरपासून फक्‍त नेटफ्लिक्‍सवर!

पाठलाग आजपासून सुरू होत आहे. १९८०च्‍या दशकातील मुंबईमध्‍ये घेऊन जाणारा चित्रपट ‘इन्‍स्‍पेक्‍टर झेंडे’ आता नेटफ्लिक्‍सवर पाहता येणार आहे. या चित्रपटामध्‍ये मनोज बाजपेयी यांनी विनोदी व हुशार पोलिसाची भूमिका साकारली आहे, जो ‘स्विमसूट किलर’ कार्ल भोजराजला (जिम सर्भ) एकदा नाही तर दोनदा पकडतो. या चित्रपटामध्‍ये विलक्षण विनोदासह लक्षवेधक ड्रामाचे संयोजन आहे, ज्‍यामधून दिग्‍गज पोलिसाची खरी कथा पाहायला मिळते.

      मनोज बाजपेयी यांनी हुशार पोलिस झेंडेची भूमिका साकारली आहे, जो जिम सर्भ यांनी साकारलेली मोहक, पण अविचारी कार्ल भोजराजचा मांजर-उंदराच्‍या शर्यतीप्रमाणे पाठलाग करतो. झेंडेच्‍या विश्वसनीय टीममध्‍ये दिग्‍गज सचिन खेडेकर, भालचंद्र कदम, हरिश दुधाडे, ओंकार राऊत, भरत सावळे, नितीन भजन यांच्‍यासह गिरिजा ओक आणि वैभव मांगले प्रमुख भूमिकेत आहेत. त्‍यांच्‍यामधील साहचर्य आणि खेळकर गमतीजमती चित्रपटाच्‍या कथानकाला रोमांचक व मनोरंजनूपर्ण ठेवतात. विविध शहरांमधून केला जाणारा हा पाठलाग अखेर गोव्‍यामध्‍ये येऊन थांबतो, जेथे कुशल डावपेच आणि उत्तम टीमवर्कमुळे नाट्यमयरित्‍या कार्ल पकडला जातो. या चित्रपटाचे दिग्‍दर्शक चिन्‍मय मांडलेकर आहेत आणि जय शेवक्रमणी व ओम राऊत निर्माते आहेत. बुद्धी, धाडस व इतिहासाने भरलेला हा पाठलाग पहा ५ सप्‍टेंबरपासून फक्‍त नेटफ्लिक्‍सवर.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

डिजिटल अध्यापनासाठी प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण

डिजिटल अध्यापनासाठी प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण        &n…