no images were found
‘अरण्य’ १९ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
आदिवासी भागातील संघर्ष, नक्षलवाद आणि एका वडील-मुलीच्या नात्याची हृदयस्पर्शी कहाणी सांगणारा आगामी मराठी चित्रपट ‘अरण्य’ कोल्हापूरमध्ये आपल्या प्रमोशनसाठी दाखल झाला आहे. अमोल दिगांबर करंबे लिखित-दिग्दर्शित हा चित्रपट सामाजिक संदेश देतानाच प्रेक्षकांना भावनिक प्रवास घडवून आणतो.
‘अरण्य’चे निर्माते शरद पाटील आणि अंजली पाटील असून, एस. एस. स्टुडिओज व XPO प्रस्तुत, ADIK Filmsच्या सहकार्याने हा चित्रपट प्रेक्षकांसमोर येत आहे.
चित्रपटात प्रमुख भूमिकेत हार्दिक जोशी झळकतो असून त्याच्यासोबत वीणा जगताप, चेतन चवडा, अमोल खापरे, सुरेश विश्वकर्मा, विजय निकम आणि ह्रितिका पाटील यांच्या दमदार भूमिका प्रेक्षकांच्या मनाला भिडतील.
चित्रपटाचे पोस्टर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच प्रकाशित झाले असून, राज्यभर या चित्रपटाची मोठी चर्चा सुरू आहे.
तांत्रिक चमू
•लेखन-दिग्दर्शन : अमोल दिगंबर करंबे
•निर्माते : शरद पाटील, अंजली पाटील
•मुख्य कलाकार : हार्दिक जोशी, वीणा जगताप, चेतन चव्हाडा, अमोल खापरे, सुरेश विश्वकर्मा, विजय निकम, हृतिक पाटील
•संगीत : नितीन उगलमुगले
•गीत : मुकुंद भालेराव
•पार्श्वगायन : अवधूत गुप्ते, अजय गोगावले. पद्मनाभ गायकवाड, अनाया वाडकर, नितीन उगलमुगले.
कोल्हापूरकर रसिकांना हा चित्रपट आपल्या जवळचा वाटेल, कारण तो केवळ संघर्षाची गोष्ट नसून, नात्यांची आणि बदलत्या समाजाची कहाणी आहे.अरण्य’च्या निमित्ताने “वन तिकीट, वन झाड” हा उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रेक्षकांनी या चित्रपटाचे प्रत्येक तिकीट खरेदी केल्यावर एक झाड लावण्याची जबाबदारी चित्रपट टीम घेणार आहे. पर्यावरण संवर्धनासोबत सामाजिक बांधिलकी जपण्याचा हा अनोखा उपक्रम कोल्हापूरमध्ये विशेष दखल घेणारा ठरेल.‘अरण्य’ १९ सप्टेंबर २०२५प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.