Home बँकिंग एचडीएफसी बँकेचा स्वदेशी उपायांना पाठिंबा – क्वांटम सायबर सुरक्षा स्टार्टअप क्यूएनयू लॅब्समध्ये गुंतवणूक

एचडीएफसी बँकेचा स्वदेशी उपायांना पाठिंबा – क्वांटम सायबर सुरक्षा स्टार्टअप क्यूएनयू लॅब्समध्ये गुंतवणूक

24 second read
0
0
38

no images were found

एचडीएफसी बँकेचा स्वदेशी उपायांना पाठिंबा – क्वांटम सायबर सुरक्षा स्टार्टअप क्यूएनयू लॅब्समध्ये गुंतवणूक

मुंबई, : भारतातील अग्रगण्य खासगी क्षेत्रातील बँक, एचडीएफसी बँकेने क्यूएनयू लॅब्समध्ये गुंतवणुकीची घोषणा केली आहे. क्यूएनयू लॅब्स ही फुल-स्टॅक एंड-टू-एंड क्वांटम-सेफ सायबर सुरक्षा प्लॅटफॉर्ममधील अग्रणी कंपनी आहे.  हा पुढाकार क्वांटम सुरक्षा मजबूत करण्यासोबतच स्वदेशी नवोपक्रमाद्वारे भारताच्या डिजिटल सार्वभौमत्वाला बळकटी देण्याच्या क्यूएनयूच्या वचनबद्धतेला प्रकर्षाने दर्शविते.

एचडीएफसी बँकेचे ट्रेझरी समूह प्रमुख, अरूप रक्षित म्हणाले, क्यूएनयू मध्ये गुंतवणूक केल्याने आम्हाला एक स्वदेशी आणि भविष्यासाठी सज्ज असलेल्या नवोपक्रमाला पाठिंबा देण्याची संधी मिळते. क्वांटम सायबर सुरक्षा क्षेत्रात प्रगत उपाय विकसित करून क्यूएनयू लॅब्स आपल्या क्वांटम-सेफ कम्युनिकेशन नेटवर्कद्वारे वित्तीय क्षेत्रात मौल्यवान योगदान देत आहे.”

क्यूएनयू लॅब्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सुनील गुप्ता म्हणाले, एचडीएफसी बँकेसोबत आमची सिरीज ए फंडिंग पूर्ण झाल्याबद्दल आम्हाला अत्यंत आनंद आहे. ही धोरणात्मक उपलब्धी पारंपरिक व एआय-आधारित सुरक्षा पद्धतींच्या तुलनेत क्वांटम भौतिकशास्त्राचा उपयोग करण्याच्या आमच्या अभिनव दृष्टिकोनाला मान्यता देते. आम्ही केवळ डिजिटल संपत्तीचे संरक्षण करत नाही आहोततर भारताला क्वांटम-सुरक्षित राष्ट्र बनविणे आणि त्याचे डिजिटल सार्वभौमत्व मजबूत करणे हे आमचे ध्येय आहे.”

क्यूएनयू लॅब्स ही एकात्मिक, संपूर्ण क्वांटम-सुरक्षित सायबर सुरक्षा उपायांमध्ये अग्रगण्य कंपनी आहे. क्यूएनयू क्वांटम, पेटंट प्राप्त, प्रमाणित व क्षेत्र-परीक्षित तंत्रज्ञानांच्या आधारे भौतिकशास्त्राच्या मूलभूत नियमांवर आधारित अभेद्य सुरक्षा पुरवते. त्यांचा प्रमुख उत्पादन क्यूशील्ड हे SaaS-सक्षम, फुल-स्टॅक क्वांटम-सुरक्षित प्लॅटफॉर्म आहे, जे एंडपॉइंट्स, नेटवर्क, एज आणि क्लाऊड वातावरणातील डिजिटल अधोसंरचनेची सुरक्षा हार्डवेअरपासून ते अॅप्लिकेशन स्तरावरील प्रणालींपर्यंत प्रत्येक थरावर सुनिश्चित करते.

२०१६ मध्ये स्थापन झालेली क्यूएनयू लॅब्स “भारतामध्ये जन्मलेले, जगासाठी निर्मित” या भावनेने क्वांटम-सुरक्षित उपायांमध्ये अग्रस्थानी राहिली आहे. क्वांटम भौतिकशास्त्र, फोटॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, गणित आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या गरजांच्या संगमातून क्वांटम-सुरक्षित गहन तांत्रिक सुरक्षा उपायांची यशस्वी संकल्पना, डिझाइन, विकास आणि व्यावसायीकरण करत आली आहे. आयआयटी मद्रास रिसर्च पार्कमध्ये २०१६ मध्ये स्थापन झालेली क्यूएनयू लॅब्स क्वांटम-सुरक्षित उपायांसह सायबर सुरक्षेत क्रांती घडवत आहे. तिची उत्पादने आणि उपाय रक्षा, सरकार आणि उद्योजकता क्षेत्रातील महत्त्वपूर्ण अधोसंरचना सुरक्षित करण्यात योगदान देतात.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In बँकिंग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…