Home मनोरंजन “अशा प्रकारचा शो करण्याचे मी अनेक वर्षांपासून स्वप्न पाहत होते,”: जूही परमार 

“अशा प्रकारचा शो करण्याचे मी अनेक वर्षांपासून स्वप्न पाहत होते,”: जूही परमार 

16 second read
0
0
60

no images were found

“अशा प्रकारचा शो करण्याचे मी अनेक वर्षांपासून स्वप्न पाहत होते,”: जूही परमार 

 

प्रत्येक घराची एक कहाणी असते – काही जपलेल्या तर काही कधीच न सांगितलेल्या. आपल्या नव्या ‘आपका अपना झी’ या ओळखीतून झी टीव्ही घेऊन येत आहे ‘कहानी हर घर की’ हा एक हृदयाला भिडणारा नॉन-फिक्शन फॉर्मेट आहे, जो भारतीय महिलांना त्यांच्या न बोलल्या गेलेल्या सत्य गोष्टी मोकळेपणाने सांगण्यासाठी एक सुरक्षित आणि आधार देणारा मंच उपलब्ध करून देतो. भावनिक उपेक्षा, सामाजिक दबाव, वैवाहिक अडचणी किंवा करिअरमधील तडजोडी – या सर्वांवर तो प्रामाणिक आणि निःपक्षपाती संवादाचे दरवाजे उघडतो. प्रत्येक भागामध्ये एखाद्या खऱ्या आयुष्यातील प्रभावी गोष्टीसोबत तज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ आणि सेलिब्रिटी पाहुण्यांच्या मतांमुळे एक नवी दृष्टी मिळते. या शोमधून हे अधोरेखित होते की काही कहाण्या फक्त सांगण्यालाच नाही, तर खऱ्या अर्थाने ऐकल्या जाण्यालाही पात्र आहेत.

       ‘कहानी हर घर की’ मध्ये संवादाची धुरा सांभाळत आहे जूही परमार. तिच्या स्वतःच्या जीवनप्रवासानेच तिच्या मनात महिलांविषयी आणि त्यांच्या संघर्षांविषयी एक खोल सहानुभूती निर्माण केली आहे. अनेक वर्षांपासून तिला असे वाटत होते की महिलांना फक्त ऐकून घेणारा नव्हे, तर त्यांच्या लढाईत त्यांच्यासोबत खंबीरपणे उभा राहणारा एक मंच असावा. या शोद्वारे जूही फक्त होस्टची भूमिका निभावत नाही, तर सहभागींसाठी त्या एक मैत्रीण, बहीण आणि मार्गदर्शक ठरतात, जेव्हा त्या आपले खरे सत्य मोकळेपणाने व्यक्त करतात. महिलांच्या कथा अधिक प्रभावीपणे जगापर्यंत पोहोचवण्याच्या तिच्या या बांधिलकीमुळे हा शो केवळ एक आकर्षक टीव्ही प्रोग्रॅम राहत नाही, तर तो ऐक्याची, बळाची आणि आधाराची एक अर्थपूर्ण चळवळ ठरतो.

        जूही परमार म्हणाल्या, “जितकं मला आठवतंय तितक्या काळापासून महिलांसोबत उभे राहण्याची, त्यांना आधार देण्याची, त्यांच्या आवाजाला बळ देण्याची आणि त्यांना भेडसावणाऱ्या अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहण्याची माझ्या मनात एक तीव्र इच्छा आहे. मला नेहमी वाटत आले आहे की महिलांचा प्रवास, त्यांचे संघर्ष आणि त्यांच्या यशोगाथा सगळ्यांनी ऐकल्या आणि साजऱ्या केल्या पाहिजेत. असा शो करण्याचे मी अनेक वर्षांपासून स्वप्न पाहत होते – जिथे मी खऱ्या अर्थाने काहीतरी अर्थपूर्ण योगदान देऊ शकेन. म्हणूनच मला वाटतं की हा शो माझ्यासाठी एक हाक आहे. या शोच्या माध्यमातून मी माझे ते स्वप्न वास्तवात आणू शकते आहे – एक असे सुरक्षित व्यासपीठ निर्माण करून जिथे महिला मनमोकळेपणाने बोलू शकतील, त्यांच्या लढाईत मी माझा आवाज देऊ शकेन, आणि त्यांच्या सामर्थ्य व जिद्दीच्या कथा सांगताना त्यांच्यासोबत एक सहप्रवासी होऊ शकेन. माझ्यासाठी हा शो फक्त आणखी एक प्रोजेक्ट नाही, तर तो माझ्या आयुष्याचा एक उद्देश आहे, जो मी नेहमी पूर्ण करायची इच्छा बाळगली होती.”

       ‘कहानी हर घर की’ हा फक्त एक शो ठरणार नाही, तर तो रोजचा एक भावनिक आणि हृदयाला भिडणारा अनुभव ठरेल. कारण प्रत्येक घराची एक कहाणी असते… आणि काही कहाण्या ऐकल्या गेल्याच पाहिजेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

कोल्हापूर शहरातील तावडे हॉटेल ते छत्रपती शिवाजी पुलापर्यंत उड्डाण पुल उभारण्याच्या कामाला गती मिळावी, खासदार धनंजय महाडिक यांची संसदेत मागणी

कोल्हापूर शहरातील तावडे हॉटेल ते छत्रपती शिवाजी पुलापर्यंत उड्डाण पुल उभारण्याच्या कामाला …