Home मनोरंजन उफ्फ ये लव है मुश्किल …’ मालिकेत काम करणाऱ्या आशी सिंहने यंदा पहिल्यांदाच बाल गणेश घरी आणून कुटुंबासोबत गणेशचतुर्थीचा सण साजरा केला

उफ्फ ये लव है मुश्किल …’ मालिकेत काम करणाऱ्या आशी सिंहने यंदा पहिल्यांदाच बाल गणेश घरी आणून कुटुंबासोबत गणेशचतुर्थीचा सण साजरा केला

8 second read
0
0
69

no images were found

‘उफ्फ ये लव है मुश्किल …’ मालिकेत काम करणाऱ्या आशी सिंहने यंदा पहिल्यांदाच बाल गणेश घरी आणून कुटुंबासोबत गणेशचतुर्थीचा सण साजरा केला

मुंबई,  : सध्या सोनी सबवरील ‘उफ्फ ये लव है मुश्किल …’ मालिकेत कैरीच्या भूमिकेत लोकांचे मन जिंकणारी आशी सिंह पडद्याच्या मागे देखील तिच्या लाघवी स्वभावामुळे लोकप्रिय आहे. या वर्षी तिने पहिल्यांदाच बाप्पाची मूर्ती बसवून आपल्या कुटुंबासोबत हा सण साजरा केला.

आशीने शेअर केले आहे की, हा सण तिच्या कुटुंबाचा किती आवडीचा सण आहे. यावर्षी त्यांच्या कुटुंबात विशेष उत्साह होता, कारण पहिल्यांदाच त्यांनी बाल गणेशाची मूर्ती घरी आणली. आशी आणि तिच्या भावंडांनी सगळी जबाबदारी वाटून घेतली होती. कुणी सजावटीची जबाबदारी घेतली, तर कुणी मोदक केले. आशीने आरतीची प्लेलिस्ट तयार केली. बाप्पाचे स्थान सुशोभित करण्याचे काम देखील तिने केले आणि सजावट या सणाच्या उत्साहाला साजेशी असेल पण त्यास वैयक्तिक स्पर्श असेल, याची काळजी तिने घेतली. पहिल्या दिवशी नैवेद्यासाठी तिने आपल्या आईला स्वयंपाकात मदत केली. अशाप्रकारे सगळ्या कुटुंबाने मिळून तयारी केली आणि कामाच्या स्थळीचे मित्र-मैत्रिणी देखील या आनंदोत्सवात सहभागी झाले.

या आनंदसोहळ्याविषयी सांगतात आशी म्हणते, “माझ्यासाठी पहिल्यापासूनच गणेश चतुर्थी हे कुटुंबांचे, सर्वांनी एकत्र येण्याचे पर्व आहे. बाप्पाच्या आगमनामुळे एका खास ऊर्जेचा घरात संचार होतो. यावर्षी हा सण मला अधिकच खास वाटला, कारण पहिल्यांदाच बाल गणेशाचे आमच्या घरात आगमन झाले. ‘उफ्फ ये लव है मुश्किल …’ च्या कामातून मला थोडी उसंत मिळाली याबद्दल मला कृतज्ञता वाटते, कारण त्यामुळे मी आईला स्वयंपाकात मदत करू शकले, घर सुशोभित करू शकले आणि माझ्या कुटुंबासोबत तसेच मित्रांसोबत हा सण साजरा करू शकले. यामुळे हा आनंद सोहळा परिपूर्ण झाला. सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राची पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राची पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सु…