Home गौरव सन्मान कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांचा ‘क्यूएस आय-गेज’ संचालकांकडून गौरव : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाला डायमंड प्रमाणपत्र प्रदान

कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांचा ‘क्यूएस आय-गेज’ संचालकांकडून गौरव : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाला डायमंड प्रमाणपत्र प्रदान

40 second read
0
0
49

no images were found

कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांचा ‘क्यूएस आय-गेज’ संचालकांकडून गौरव : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाला डायमंड प्रमाणपत्र प्रदान

 

कोल्हापूर (प्रतिनिधी):डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाने पहिल्याच प्रयत्नात ‘क्यूएस आय-गेज’ डायमंड श्रेणी प्राप्त केल्याबद्दल ‘क्यूएस आय-गेज’चे व्यवस्थापकीय संचालक रविन नायर व सहाय्यक संचालक सुबिन राज यांनी कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांना सन्मानित केले. नायर यांनी विद्यापीठाच्या सर्वोत्तम कामगिरीचा गौरव करत डॉ. पाटील यांच्याकडे ‘क्यूएस आय-गेज’ प्रमाणपत्र प्रदान केले.  

         कदमवाडी येथील डी वाय पाटील कॉलेज सभागृहात हा गौरव सोहळा संपन्न झाला. यावेळी बेंगळुरहून ‘क्यूएस आय-गेज’ चे व्यवस्थापकीय संचालक रविन नायर व सहाय्यक संचालक सुबिन राज उपस्थित होते.  विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, आय. क्यू. ए. सी. संचालक डॉ. शिंपा शर्मा आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी डॉ. संजय डी. पाटील यांना मानाचा कोल्हापुरी फेटा बांधून विद्यापीठाच्यावतीने कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा यांनी सन्मानित केले.

      रवीन नायर म्हणाले,  डी. वाय पाटील अभिमत विद्यापीठाने पहिल्याच प्रयत्नात ‘क्यूएस आय-गेज’ डायमंड मानांकन मिळवणे हे अतिशय कौतुकास्पद आहे. यामुळे विद्यापीठाची विविध पातळीवर असलेली गुणवत्ता सिद्ध होते. विद्यापीठाना बळकटी देण्यासाठी आमची एजन्सी काम करते. ‘क्यूएस आय-गेज’ संस्था विद्यापीठाकडून देण्यात येणाऱ्या कॉलिटी एज्युकेशनचे  परीक्षण करते व विविध निकषांवर मानांकन देते. या मानांकनामुळे जागतिक पातळीवर नवे यश संपादन करण्यासाठी विद्यापिठाच्या प्रयत्नांना गती मिळेल. आंतरराष्ट्रीय दर्जाचे अभ्यासक्रम सुरू होतील आणि त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

       कुलगुरू डॉ. शर्मा म्हणाले, कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठाने प्रगतीचे नव -नवीन टप्पे गाठले आहे. हे मानांकन  विद्यापीठाला आणखी वेगाने प्रगती करण्याची प्रेरणा देईल. येत्या काळात विद्यापीठाला नव्या उंचीवर नेण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्रित प्रयत्न करू.

      आय क्यू ए.सी. डायरेक्टर डॉ. शिंपा शर्मा यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले. त्यांनी ‘क्यूएस आय-गेज’ मानांकन मिळण्यामागील प्रवास विषद करून या प्रवासातील सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन केले. 

      तत्पूर्वी रविन नायर व सुबीन राज यांनी डी वाय पाटील हॉस्पिटल,  मेडिकल कॉलेज, सिम्युलेशन लॅब सह विविध विभागांना भेट दिली. त्यानंतर  विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून गुणवत्ता हमी व पुढील प्रगतीबद्दल मार्गदर्शन केले.

       या गौरव सोहळ्याला डी. वाय पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए.के. गुप्ता, अजय डोईजड, सोहन शिरगावकर, ॲड. रवी शिराळकर, सायबर कॉलेजचे डॉ. सर्मा, परीक्षा नियंत्रक अभय जोशी, डॉ. आर. बी. नेरली यांच्यासह डी. वाय पाटील ग्रुपच्या विविध संस्थांचे प्राचार्य, रजिस्ट्रार, विभाग प्रमुख, प्राध्यापक व कर्मचारी आदी उपस्थित होते.डॉ. मान्या मिध्धा व डॉ.ओमसिंग शेखावत यांनी सूत्रसंचालन केले तर आभार डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी मानले.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In गौरव सन्मान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

कर्जमाफी योजनेवरील विरोधकांची टीका दिशाभूल करणारी-हेमंत पाटील  पात्र शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचवण्यावर सरकारचा भर पुणे,: महाराष्ट्र सरकारच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजने’वर विरोधकांकडून सातत्याने केली जाणारी टीका राजकीय हेतूने प्रेरित आहे, असा दावा भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी केला आहे. शेतकरी हितार्थ सरकारने उचललेल्या भूमिकेचे त्यांनी स्वागत केले आहे. मंत्रिमंडळ टिपणाचा हवाला देत कर्जमाफी योजनेतील पात्रतेच्या अटींमुळे राज्यावरील आर्थिक भार कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, या अटींचा उद्देश शेतकऱ्यांना वंचित ठेवणे नसून, प्रत्यक्ष गरजू आणि पात्र शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवणे हा आहे; असे प्रतिपादन पाटील यांनी केले. राज्य सरकारने अत्यंत जबाबदारीने ही योजना तयार केली आहे. सार्वजनिक निधीचा योग्य वापर व्हावा आणि कर्जमाफीचा लाभ खऱ्या अर्थाने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनाच मिळावा, यासाठी काही निकष ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे योजनेची परिणामकारकता वाढणार असून, निधीचा अपव्यय टाळण्यास मदत होईल, असे पाटील म्हणाले. विरोधकांनी योजनेतील अटींचा आधार घेत सरकारवर टीका करण्याऐवजी शेतकऱ्यांच्या हितासाठी विधायक सूचना द्याव्यात, असे आवाहनही त्यांनी केले. राज्य सरकारने कर्जमाफीबरोबरच सिंचन, पीकविमा, कृषी पायाभूत सुविधा आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. शेतकरी कल्याण आणि कृषी क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी सरकार कटिबद्ध असून, या योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना होणार असल्याचा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

कर्जमाफी योजनेवरील विरोधकांची टीका दिशाभूल करणारी-हेमंत पाटील  पात्र शेतकऱ्यांपर्यंत …