Home शासकीय आदर्श पशुपालक, स्वच्छ व सुंदर गोठा अभियानासाठी अर्ज करण्याचे आवाहन

आदर्श पशुपालक, स्वच्छ व सुंदर गोठा अभियानासाठी अर्ज करण्याचे आवाहन

6 second read
0
0
162

no images were found

आदर्श पशुपालक, स्वच्छ व सुंदर गोठा अभियानासाठी अर्ज करण्याचे आवाहन

कोल्हापूर, : राज्याच्या ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार युवकांसह, पशुपालक व शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करुन देत त्यांना शाश्वत अर्थार्जनाचा पर्याय उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत व जिल्हा परिषद कोल्हापूर मधील स्वनिधीतून आदर्श पशुपालक, स्वच्छ व सुंदर गोठा अभियान ही योजना पशुसंवर्धन विभागामार्फत सन 2025-2026 अंतर्गत राबवण्यात येणार आहे. या योजनेसाठी जास्तीत जास्त अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी केले आहे. 

     प्रस्ताव 15 ऑगस्ट  ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत नजिकच्या पशुवैद्यकीय संस्थेत सादर करावा. प्रस्तावाची तालुका व जिल्हा स्तरावर पडताळणी होणार असून तालुका व जिल्हा स्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय उत्कृष्ट गोठ्यांची निवड करून सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख पारितोषिक देऊन सपत्नीक सत्कार करण्यात येणार आहे. अर्जाचा नमुना मिळवण्याकरीता खालील QR CODE स्कॅन करावा, असे आवाहन पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाचे जिल्हा उपआयुक्त डॉ. महेश शेजाळ यांनी केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…