Home शैक्षणिक न्यू कॉलेज ऑफ फार्मसी तर्फेअँटी-रँगिंग जनजागृती सप्ताह

न्यू कॉलेज ऑफ फार्मसी तर्फेअँटी-रँगिंग जनजागृती सप्ताह

30 second read
0
1
215

no images were found

न्यू कॉलेज ऑफ फार्मसी तर्फेअँटी-रँगिंग जनजागृती सप्ताह

    कोल्हापूर(उंचगाव) : श्री. प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित  न्यू कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर मध्ये दिनांक १२ ऑगस्ट ते १८ ऑगस्ट २०२५ रोजी  अँटी रँगिंग जनजागृती सप्ताह साजरा करण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये रँगिंग विषयी जागरुकता निर्माण करून “रँगिंगमुक्त कॅम्पस घडवणे हा होता .

          विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यात मार्गदर्शन पर व्याख्याने, पोस्टर स्पर्धा, रांगोळी स्पर्धा तसेच विद्यार्थ्यांसाठी चर्चासत्र यांचा समावेश सप्ताहामध्ये होता.

 महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सचिन पिशवीकर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना रँगिंग हा गंभीर गुन्हा असून त्यापासून दूर राहण्याचे आवाहन केले.

      व्याख्यानाम्ध्ये Adv.पूजा देशमुख (District & Session Court Kolhapur) यांनी विद्यार्थ्यांना रँगिंग ची व्याख्या रँगिंग चे मानसिक, सामाजिक  आणि शैक्षणिक परिणाम तसेच त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना यांचे मार्गदर्शन केले. व कायदेशीर तरतूदीची माहिती दिली व उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

      रांगोळी  स्पर्धमध्ये अनुक्रमे प्रथम क्रमांक प्रणिता कांबळे, अंकिता पाटील द्वितीय क्रमांक शुभांगी अवघडे, मर्जीना मुजावर यांनी मिळविले व पोस्टर स्पर्धेमध्ये अनुक्रमे प्रथम क्रमांक प्राची निगडे व मृणाली माने , द्वितीय क्रमांक मेघराज पाटील व सुशांत पाटील यांनी मिळवले. 

      कार्यक्रमाचे आयोजन अँटी रँगिंग समितीच्या वतीने करण्यात आले. यावेळी शिक्षकवृंद , विद्यार्थी, व कर्मचारी उपस्तीत होते.  

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…