Home उद्योग आदित्य बिर्ला सन लाइफ एएमसीने इचलकरंजीमध्ये नवीन शाखेचे उद्घाटन करून विस्तारले महाराष्ट्रातील कार्यक्षेत्र

आदित्य बिर्ला सन लाइफ एएमसीने इचलकरंजीमध्ये नवीन शाखेचे उद्घाटन करून विस्तारले महाराष्ट्रातील कार्यक्षेत्र

4 second read
0
0
123

no images were found

आदित्य बिर्ला सन लाइफ एएमसीने इचलकरंजीमध्ये नवीन शाखेचे उद्घाटन करून विस्तारले महाराष्ट्रातील कार्यक्षेत्र

या प्रदेशातील आर्थिक वाढीला चालना देण्याच्या दृष्टीने गुंतवणूक उत्पादने देऊ करण्यासाठी गुंतवणूकदारांमधील व्याप्ती अधिक भक्कम करण्याच्या उद्देशाने विस्तार
इचलकरंजी, : आदित्य बिर्ला सन लाइफ एएमसी लिमिटेड (एबीएसएलएएमसी) ही कंपनी १९९४ मध्ये समाविष्ट करण्यात आली. आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेड आणि सन लाइफ (इंडिया) एएमसी इन्व्हेस्टमेंट इंक हे कंपनीचे प्रमोटर तसेच प्रमुख समभागधारक आहेत. एबीएसएलएएमसी ही प्रामुख्याने आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंडची गुंतवणूक व्यवस्थापन कंपनी असून भारतीय ट्रस्ट्स कायदा, १८८२ अंतर्गत तिची ट्रस्ट म्हणून नोंदणी करण्यात आली आहे. कंपनीने महाराष्ट्रातील इचलकरंजी येथे नवीन शाखा सुरू केली आहे. यातून देशभरातील प्रमुख बाजारपेठांमधील कार्यक्षेत्र मजबूत करण्याप्रती कंपनीची बांधिलकी दिसून येते.
एबीएसएलएएमसीची वैविध्यपूर्ण गुंतवणूक उत्पादने स्थानिक समुदायापर्यंत पोहोचवून गुंतवणूकदार व आर्थिक संधी यांमधील तफावत भरून काढण्याचे प्रमुख केंद्र म्हणून ही शाखा काम करणार आहे. या शाखेद्वारे व्यक्तीगत तसेच संस्थात्मक गुंतवणूकदारांना गुंतवणूक उत्पादनांचा सर्वसमावेशक समूह देऊ केला जाईल, या प्रदेशातील वितरण सहयोगींना सक्षम करण्यावर आवर्जून भर दिला जाईल. गुंतवणूकदारांना सक्षम करून तसेच त्यांच्या आर्थिक महत्त्वाकांक्षांमध्ये वाढ करून एबीएसएलएएमसीच्या महाराष्‍ट्रातील विशेषत: इचलकरंजीमधील उदयोन्मुख बाजारपेठांमधील वाढीत सक्रिय भूमिका बजावण्यास ही शाखा सज्ज आहे.
आदित्य बिर्ला सन लाइफ एएमसी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) व मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) ए. बालसुब्रमणियन या शाखेच्या उद्घाटनाबद्दल म्हणाले, “आमच्या इचलकरंजी शाखेचे उद्घाटन हा ‘इमर्जिंग मार्केट’ धोरणातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे, भारतभरात म्युच्युअल फंडातील रिटेल सहभाग वाढवण्याचे उद्दिष्ट यामागे आहे. वस्त्रोद्योगावर आधारित बाजारपेठ तसेच वाढती आर्थिक साक्षरता यांमुळे इचलकरंजीमध्ये दीर्घकालीन औद्योगिक वाढीच्या प्रचंड संधी आहेत. म्युच्युअल फंड उद्योगाने इचलकरंजीत स्थिर विस्तार साध्य केला आहे, याचा अर्थ गुंतवणूकदारांचे स्वारस्य वाढत आहे. एबीएसएलएएमसीची गुंतवणूक उत्पादनांची व्यापक श्रेणी, सोयीस्कर डिजिटल प्लॅटफॉर्म आणि शहराला दिल्या जाणाऱ्या विश्‍वासार्ह सेवा यांच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना साधने व मार्गदर्शन यांच्यासह सक्षम करण्याची आमची इच्छा आहे. ही साधने व मार्गदर्शन यांमुळे त्यांना आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यात मदत होऊ शकेल आणि या भागातील म्युच्युअल फंड परिसंस्थाही अधिक सशक्त होऊ शकेल.”
सध्या एबीएसएलएएमसी देशभरातील ३००हून अधिक ठिकाणांवरील विस्तृत नेटवर्कच्या माध्यमातून काम करत आहे. या नवीन शाखेचा पत्ता पुढीलप्रमाणे- तळमजला, नारायणपेठ, शॉपिंग सेंटर, फ्रुट लाइन, जुना बॉम्बे आइस्क्रीम रोड, इचलकरंजी- ४१६११५, महाराष्ट्रातील रिटेल वितरण नेटवर्क मजबूत करण्यात ही शाखा योगदान देणार आहे. महाराष्ट्रात कंपनीच्या १८ नियमित शाखा आणि १० विशेष ईएम लोकेशन्स आहेत. देशभरातील, विशेषत: श्रेणी ३ व ४ शहरांतील विश्वासाचा अॅसेट व्यवस्थापन हे फंड हाऊसचे स्थान या विस्तारामुळे अधोरेखित झाले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In उद्योग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…