no images were found
अभिनेत्रींनी स्वातंत्र्य दिन साजरीकरणाच्या हृदयस्पर्शी आठवणींबाबत सांगितले!
प्रत्येक भारतीयाच्या मनात स्वातंत्र्य दिनाचे खास स्थान आहे आणि एण्ड टीव्हीवरील आपल्या लाडक्या अभिनेत्री याबाबतीत अपवाद नाहीत. परेड आणि देशभक्तीवर आधारित गाण्यांव्यतिरिक्त या साजरीकरणांनी त्यांना खास आठवणी दिल्या आहेत, ज्या त्या नेहमी जपून ठेवतील. यामध्ये काही बालपणीच्या आठवणी आहेत, तर काही हृदयस्पर्शी अनुभव आहेत. शाळेतील मित्रमैत्रिणींसोबत तिरंगा फडकवण्यापासून ते सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सादरीकरण करण्यापर्यंत प्रत्येक कथेतून या दिवसाची प्रेरणा देणारा अभिमान आणि एकता दिसून येते. या अभिनेत्री आहेत नीहारिका रॉय (सावी, ‘घरवाली पेडवाली’), गीतांजली मिश्रा (राजेश, ‘हप्पू की उलटन पलटन’) आणि शुभांगी अत्रे (अंगूरी भाबी, ‘भाबीजी घर पर है’). आगामी मालिका ‘घरवाली पेडवाली’मधील नीहारिका रॉय ऊर्फ सावी म्हणाल्या, ”काही वर्षांपूर्वी मी सर्वात संस्मरणीय स्वातंत्र्य दिन साजरीकरणाचा आनंद घेतला होता. मी शूटिंगसाठी महाराष्ट्रातील दुर्गम गावामध्ये गेले होते. आम्ही १५ ऑगस्टबाबत शूटिंग करत होतो आणि स्थानिकांनी आपल्या संपूर्ण टीमला त्यांच्या साजरीकरणामध्ये सामील होण्याचे आमंत्रण दिले. तेथे भव्य मंच किंवा भव्य सेटअप नव्हता, फक्त लहानसे खुले मैदान, उंच ध्वजस्तंभ आणि उत्साहपूर्ण आनंद होता. ध्वजारोहणानंतर, त्यांनी इतक्या प्रामाणिकपणे देशभक्तीवर आधारित गाणी गायली की मी त्यामध्ये भारावून गेले. आम्ही जेवण केले आणि मला जाणवले की देशभक्ती उत्सवाच्या प्रमाणात नसून त्यामागील भावनेच्या प्रामाणिकपणाबद्दल आहे. त्या दिवशी, मला माझ्या देशाशी व लोकांशी आणखी मजबूत नाते जाणवले आणि ते माझ्या हृदयात कायमचे कोरले गेले आहे.”
मालिका ‘हप्पू की उलटन पलटन’मधील गीतांजली मिश्रा ऊफ्र राजेश म्हणाल्या, ”मला आजही माझ्या शाळेमध्ये साजरा केलेल्या प्रत्येक स्वातंत्र्यदिनाचा उत्साह आठवतो. मी लवकर उठायचे, पांढरा कुर्ता-पायजमा परिधान करायचे, छातीवर छोटा तिरंगा बॅज लावायचे आणि ध्वजारोहणासाठी शाळेत जायचे. शेकडो आवाजात राष्ट्रगीत सुरू होताच माझ्या अंगावर काटा यायचा. एके वर्षी, मी स्वातंत्र्यसैनिकांबद्दलच्या पथनाट्याचा भाग होते. आम्ही संपूर्ण शाळेसमोर सादरीकरण केले आणि आम्हाला मिळालेल्या टाळ्यांमुळे मला जाणीव झाली की इतिहास जिवंत ठेवण्यासाठी कथाकथन किती शक्तीशाली असू शकते. आजही अभिनेत्री म्हणून मी ती भावना जपून ठेवली आहे. स्वातंत्र्यदिन अजूनही माझ्यामध्ये अभिमान जागृत करतो आणि एकता, आदर व खरोखर महत्त्वाच्या कृतींद्वारे आपल्या स्वातंत्र्याचा सन्मान करण्याची आठवण करून देतो.” मालिका ‘भाबीजी घर पर है’मधील शुभांगी अत्रे ऊर्फ अंगूरी भाबी म्हणाल्या, ”मला एक स्वातंत्र्यदिन खूप आठवतो, मी मुलांसोबत स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एका अनाथाश्रमात गेले होते. आम्ही एकत्र ध्वज फडकवला, देशभक्तीपर गाणी गायली आणि मिठाया वाटल्या. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद निखळ आणि अद्भुत होता, तसेच मला जाणीव झाली की खरा उत्सव म्हणजे आनंद आणि एकता पसरवण्याबाबत आहे. मी माझ्या शालेय दिवसांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांत भाग घ्यायची, जेथे प्रत्येक कार्यक्रम ऐक्य आणि अभिमानाची भावना जागृत करायचा. माझ्यासाठी, स्वातंत्र्यदिन म्हणजे केवळ भूतकाळाची आठवण ठेवणे नाही तर वर्तमानात सकारात्मक योगदान देणे देखील आहे. मी प्रत्येक वेळी आकाशात तिरंगा फडकताना पाहते तेव्हा माझे मन कृतज्ञता व अभिमानाने भरून जाते.”