no images were found
कोल्हापूर जिल्हा सब-ज्युनिअर निवड बुद्धिबळ स्पर्धेत संस्कृती सुतार व वेदांत बांगड अजिंक्य कोल्हापूर (प्रतिनिधी):- अयोध्या टॉवर, दाभोळकर कॉर्नर, कोल्हापूर येथे चेस असोसिएशन कोल्हापूरने आयोजित केलेल्या कोल्हापूर जिल्हा सबज्युनिअर (पंधरा वर्षाखालील मुला-मुलींच्या)निवड बुद्धिबळ स्पर्धा संपन्न झाल्या. मुलांच्या गटात सहावा मानांकित इचलकरंजीचा वेदांत बांगड सहा पैकी साडेपाच गुण घेऊन अजिंक्य ठरला.. द्वितीय मानांकित गडहिंग्लजचा स्वरूप साळवेने पाच गुण व सरस टायब्रेक गुणामुळे उपविजेतेपद संपादिले.अथर्व तावरे (इचलकरंजी) व अर्णव पोर्लेकर (कोल्हापूर) हे दोघांनी अनुक्रमे तिसरे व चौथे स्थान मिळविले. मुलींच्या गटात अग्रमानांकित नांदणीच्या संस्कृती सुतारने पाच पैकी पाच गुण मिळवून अपेक्षेप्रमाणे अजिंक्यपद पटकाविले. सहावी मानांकित इचलकरंजीच्या नंदिनी सारडाने चार गुणासह उपविजेतेपदावर मुसंडी मारली . द्वितीय मानांकित कोल्हापूरच्या अरीना मोदी व चौथी मानांकित जयसिंगपूरच्या सिद्धी कर्वे ने अनुक्रमे तिसरे व चौथे स्थान प्राप्त केले. सर्व निवड झालेल्या विजेत्यांना रोख बक्षीस व चषक देऊन गौरविण्यात आले. या सर्वांची निवड छत्रपती संभाजी नगर येथे दिनांक 15 ते 17 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या महाराष्ट्र राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्हा संघात झाली आहे. इचलकरंजी, जयसिंगपूर,वारणानगर, गडहिंग्लज व स्थानिक कोल्हापूर येथील नामवंत ७० मुले या स्पर्धेत सहभागी झाले होते. यापैकी 26 बुद्धिबळपटू आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त होते. स्पर्धेचा बक्षीस समारंभ चेस असोसिएशन कोल्हापूरचे ज्येष्ठ प्रशिक्षक उत्कर्ष लोमटे व प्रितम घोडके, वरिष्ठ राष्ट्रीय पंच आरती मोदी,सहाय्यक पंच सचिन वणीरे,प्रशांत पिसे, मंदार परांजपे व अर्पिता दिवाण यांच्या शुभहस्ते झाले. *उत्तेजनार्थ बक्षीसे पुढील प्रमाणे*. *अकरा वर्षाखालील उत्कृष्ट:-* मुले 1) वन्शील ठक्कर कोल्हापूर 2) अरजीत पाटील कोल्हापूर मुली 1) प्राप्ती चिखलीकर कोल्हापूर *नऊ वर्षाखालील उत्कृष्ट :-* मुले 1) अवनीश जितकर कोल्हापूर 2) निलमाधव पिल्लाई कोल्हापूर ; मुली 1) अवनी सूर्यवंशी इचलकरंजी 2) नारायणी घोरपडे कोल्हापूर . *सात वर्षाखालील उत्कृष्ट :-* मुले 1) अद्वैत कुलकर्णी कोल्हापूर 2) सौमित्र जोशी कोल्हापूर मुली 1) नक्षत्रा कांबळे कोल्हापूर 2) हिंदवी पाटील कोल्हापूर