Home Video शंभर कोटीच्या रस्त्यावर फक्त डिफेंडरच चालू शकते,निकृष्ट रस्त्यावर आप चे लक्षवेधी आंदोलन

शंभर कोटीच्या रस्त्यावर फक्त डिफेंडरच चालू शकते,निकृष्ट रस्त्यावर आप चे लक्षवेधी आंदोलन

30 second read
0
0
101

no images were found

 

शंभर कोटीच्या रस्त्यावर फक्त डिफेंडरच चालू शकते,निकृष्ट रस्त्यावर आप चे लक्षवेधी आंदोलन

 

कोल्हापूर (प्रतिनिधी):नगररोत्थान योजनेतून शहरात शंभर कोटी रुपयांचे रस्ते करण्याचे काम सुरु आहे. परंतु पहिल्याच पावसात यामधील अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहे. रस्त्यांच्या निकृष्ट कामावर आप ने शाहू मैदान येथे डिफेंडर या आलिशान गाडीची प्रतिकृती उभा करून लक्षवेधी आंदोलन केले. 

     ‘शंभर कोटीच्या रस्त्यावर फक्त डिफेंडरच चालू शकते’ असे लिहलेला फलक नागरिकांचे लक्ष वेधून घेत होता. नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आ. राजेश क्षीरसागर यांनी जर शंभर कोटींचा निधी मंजूर करून आणला असेल तर ते काम कसे दर्जेदार होईल हे बघणे देखील त्यांचे काम आहे. ते स्वतः आलिशान गाड्यांमधून फिरतात, त्यामुळे खराब रस्त्यांमुळे दुचाकीस्वार, रिक्षाचालक आणि सामान्य कोल्हापूरकरांचे होणारे हाल समजत नाहीत अशी टीका आप चे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी केली.

     सुमार दर्जाचे काम होऊनही या ठेकेदाराचे तब्बल 22 कोटी इतके बिल अदा करणारे अधिकाऱ्यांचे साटेलोटे आहे, शहरातील रस्त्यांचे डांबर खाणारे अधिकारी, ठेकेदार, सल्लागार, सब-ठेकेदार, लोकप्रतिनिधी हेच या निकृष्ट रस्त्यांसाठी कारणीभूत आहेत असेही ते म्हणाले.

      मुदत उलटून गेली तरी अद्याप ही कामे पूर्ण झालेले नाहीत. या कामाचा दर्जा राखला जावा यासाठी आवश्यक त्या चाचण्या कराव्यात यासाठी आप चा महापालिकेकडे सातत्याने पाठपुरावा सुरु होता, परंतु महापालिकेने याकडे दुर्लक्ष केले. हे रस्ते त्याचाच परिणाम असल्याचे आप पदाधिकाऱ्यांनी सांगितले. 

     गटर चॅनेलची कामे रस्ता करण्याआधी न करणे, सेन्सर मशीन न वापरणे, जबाबदार अधिकारी साईटवर उपलब्ध नसणे यामुळे रस्त्याचा दर्जा सुमार होत असल्याचा आरोप आप ने केला होता. 

     या कामासाठी मे. एवरेस्ट कन्स्ट्रक्शन यांची ठेकेदार, तर संदीप गुरव अँड असोसिएट यांची सल्लागार म्हणून नेमणूक केली आहे. योग्य मटेरियल वापरणे, रस्त्याची मापे घेणे, डिझाईन प्रमाणे काम करून घेणे, दर्जा राखण्यासाठी आवश्यक ते टेस्ट करण्यासाठी समन्वय साधने या जबाबदाऱ्या त्यांच्याकडे आहेत. परंतु त्यामध्ये ही कसूर झाली आहे. यांच्यावर प्रशासक कारवाई करणार का असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला. 

     यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील, अभिजित कांबळे, सूरज सुर्वे, समीर लतिफ, दुष्यंत माने, उषा वडर, विजय हेगडे, राकेश गायकवाड, संजय नलवडे, उमेश वडर, लखन काझी, रणजित पाटील, स्वप्नील काळे, बबन भालेराव, अमरसिंह दळवी, आदित्य पोवार, प्रकाश हरणे, रमेश कोळी आदी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Video

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

भागीरथी संस्था आणि भाजपच्यावतीने कोल्हापुरातील देवकर पाणंदमध्ये झालेल्या मोफत प्रशिक्षण शिबीराला महिलांचा मोठा प्रतिसाद

भागीरथी संस्था आणि भाजपच्यावतीने कोल्हापुरातील देवकर पाणंदमध्ये झालेल्या मोफत प्रशिक्षण शि…