Home शासकीय धामणवाडी येथे 33 केव्ही मुख्य वीज वाहिनीचे पोल शिफ्टिंगचे कामामुळे सोमवार काळम्मावाडी योजनेचा पाणी पुरवठा बंद

धामणवाडी येथे 33 केव्ही मुख्य वीज वाहिनीचे पोल शिफ्टिंगचे कामामुळे सोमवार काळम्मावाडी योजनेचा पाणी पुरवठा बंद

12 second read
0
0
44

no images were found

धामणवाडी येथे 33 केव्ही मुख्य वीज वाहिनीचे पोल शिफ्टिंगचे कामामुळे सोमवार काळम्मावाडी योजनेचा पाणी पुरवठा बंद

कोल्हापूर, (प्रतिनिधी) : काळम्मावाडी योजनेस वीज पुरवठा करणाऱ्या 33 केव्ही मुख्य वीज वाहिनीचे धामणवाडी येथे पोल शिफ्टिंगचे काम महावितरणकडून सोमवार, 21 जुलै 2025 रोजी सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. या कालावधीत या योजनेचा वीजपुरवठा खंडित राहणार असल्याने कोल्हापूर शहरासह उपनगरे व काही ग्रामीण भागातील पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.  वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतर तातडीने पाणी उपसा सुरू करण्यात येणार आहे. दरम्यान, बालिंगा योजनेवर अवलंबून असणाऱ्या सी व डी वॉर्डमधील भागांचा पाणीपुरवठा सुरळीत सुरू राहणार आहे.

         यामध्ये यामध्ये संपुर्ण ए,बी वॉर्डातील पुईखडी, कलिकते नगर, सुलोचना पार्क, इंगवले कॉलनी, नाना पाटील नगर, जिवबा नाना पार्क, बापूरामनगर, साळोखेनगर, राजीव गांधी वसाहत, कात्याणी कॉम्पलेक्स, तपोवन, देवकर पाणंद, मोरे माने नगर, संभाजीनगर स्टँड परिसर, नाळे कॉलनी, रामानंदनगर, बालाजी पार्क, शाहू कॉलनी, सासणे कॉलनी, रायगड कॉलनी, जरगनगर, सुभाषनगर, शेंडापार्क, आर.के.नगर, भारती विद्यापीठ, म्हाडा कॉलनी, संभाजीनगर, गंजीमाळ, संपुर्ण शिवाजी पेठ, राजकपूर पुतळा परिसर, संपुर्ण मंगळवार पेठ, पोतणीस बोळ, मंगेशकर नगर, बेलबाग, महालक्ष्मीनगर, सरनाईक वसाहत, त्रिकोणी गॅरेज परिसर, नेहरूनगर, वाय.पी.पोवार नगर, जवाहर नगर. ई वॉर्ड राजारामपुरी अंतर्गत संपूर्ण राजारामपुरी, शाहू मिल, शाहुमिल कॉलनी, वैभव हौसिंग सोसायटी, ग्रीनपार्क, शांतीनिकेतन, रेव्हेन्यु कॉलनी, अरूणोदय परिसर, राजेंद्रनगर, चौगुले हायस्कुल परिसर, सम्राटनगर, प्रतिभानगर, इंगळेनगर, दौलतनगर, उद्यमनगर, शास्त्रीनगर, पांजरपोळ, नवश्या मारुती चौक, दत्तगल्ली, यादवनगर, कामगार चाळ, पंत मंदीर, जगदाळे कॉलनी, महावीरनगर, अश्विनी नगर, जागृती नगर, पायमल वसाहत, अंबाई डीफेन्स, राजाराम रायफल, काटकरमाळ, बावडा फिल्टर हाऊसवर अवलंबून असणारा संपूर्ण कसबा बावडा, लाईन बाजार, लोणार वसाहत, राजीव गांधी वसाहत, महाडीक वसाहत, रूईकर कॉलनी, लिशा हॉटेल परिसर, सदर बाजार, कदमवाडी, जाधववाडी, बापट कॅम्प, शिवाजी पार्क, फ्रेंड्स कॉलनी, ताराबाई पार्क, नागाळा पार्क, रमणमळा, शालीनी पॅलेस परिसर, मुक्त सैनिक वसाहत, मार्केट यार्ड, सी.बी.एस. स्टेशन रोड, साईक्स एक्सटेंशन, न्यु शाहुपूरी, खानविलकर पेट्रोलपंप परिसर, शाहुपूरी व्यापारपेठ, व्हीनस कॉर्नर, शाहुपूरी 1 ते 4 गल्ली, बी.टी.कॉलेज, बापट कँप, संपुर्ण टेंबलाईवाडी, पाच बंगला इत्यादी भागामध्ये होणारा  दैनंदिन पाणी पुरवठा होऊ शकणार नाही.

         तरी या भागातील नागरिकांनी उपलब्ध होणारे पाणी काटकसरीने वापरून महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ सोशल मीडियावर सध्या एक वेगळाच चेहरा प्…