Home उद्योग Nothing Phone (3) आणि Nothing Headphone (1) आता भारतात विक्रीसाठी उपलब्ध 

Nothing Phone (3) आणि Nothing Headphone (1) आता भारतात विक्रीसाठी उपलब्ध 

23 second read
0
0
43

no images were found

Nothing Phone (3) आणि Nothing Headphone (1) आता भारतात विक्रीसाठी उपलब्ध 

Nothing या लंडनस्थित तंत्रज्ञान कंपनीने आज त्यांची दोन उत्पादने भारतात खरेदीसाठी उपलब्ध होत असल्याची घोषणा केली. आपापल्या क्षेत्रात नवे मापदंड रचणारे Nothing Phone (3) हा त्यांचा खऱ्या अर्थाने मुख्य स्मार्टफोन आणि Nothing Headphone (1) हे ओव्हर इअर ऑडिओ उत्पादनांमधील त्यांचे पहिले उत्पादन आज दुपारी १२ वाजल्यापासून भारतात उपलब्ध असणार आहेत. विचारपूर्वक डिझाइन आणि दमदार नाविन्यतेसह कन्झ्युमर टेकला नवे स्वरूप देण्याचा नथिंगचा दृष्टिकोन या नव्या उत्पादनांमधून प्रतित होत आहे.

Nothing Phone (3)

Nothing Phone (3) मधील दमदार नाविन्यतांमुळे स्मार्टफोनच्या उद्योग जगतात नवे मापदंड रचले जातील. या फोनमध्ये प्रो-ग्रेड ट्रिपल कॅमेरा प्रणाली तसेच या क्षेत्रातील सर्वोत्तम म्हणजेच 1/1.3″ मुख्य सेन्सर असल्याने कमी प्रकाशातही उत्तम फोटो काढता येतात. शिवाय यात लॉसलेस ऑप्टिकल झुम आणि सर्व लेन्सेसमध्ये सिनेमॅटिक 4K 60fps व्हिडीओ तसेच फूल ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन आहे. अल्ट्रा नॅरो कडांसह दमदार 6.67″ AMOLED डिस्प्ले आणि दमदार Snapdragon® 8s Gen 4 चिपसेट अशा अनेक सुविधा या प्रीमिअम मॉड्युलर डिझाइनमध्ये एकत्रित करण्यात आल्या आहेत.

यातील क्रांतीकारी गिल्फ मॅट्रिक्समुळे वापरकर्त्यांना महत्त्वाची सगळी माहिती चटकन पाहता येते तसेच फ्लिप टू रेकॉर्ड आणि गिल्फ टॉईज या वैशिष्ट्यांमुळे फार सुंदर अनुभव या फोनमध्ये मिळतो. Phone (3) मध्ये नव्या डिझाइनच्या R अँगल आकारासह ट्राय-कॉलम लेआऊटमुळे फोन अधिकच छान दिसतो. शिवाय यातील एकसारख्या 1.87 मिमी. कडा आणि Phone (2) च्या तुलनेत १८ टक्के पातळ असलेला हा फोन आकर्षक AMOLED स्क्रीनमुळे देखणा झाला आहे.

Nothing Headphone (1)

Nothing Headphone (1) च्या माध्यमातून Nothing ने ओव्हर इअर ऑडिओ विभागात प्रवेश केला आहे. केईएफच्या साह्याने तयार करण्यात आलेल्या या उत्पादनात आकर्षक डिझाइन आणि सुयोग्य इंजिनीअरिंगचा सुरेख मेळ साधण्यात आला आहे. कस्टम ४० मिमी दमदार ड्राइव्हपासून हेड ट्रॅकिंगसह रिअल टाईम स्पॅटिअल ऑडिओ अशा विविध वैशिष्ट्यांसह हे हेडफोन तुम्हाला श्राव्यानुभवात गुंतवून टाकतात. अॅल्युमिनीअम आणि पीयू मेमरीसह प्रीमिअम घटकांचा वापर निर्मितीसाठी करण्यात आल्याने हे हेडफोन दिवसभर वापरता येतात. शिवाय यातील रोलर, पॅडल आणि बटन अशी कंट्रोल्सची खास व्यवस्था आवाज, मीडिया आणि एएनसीवर सहजसोप्या पद्धतीने नियंत्रण ठेवण्यात साह्य करते.

रोजच्या वापरासाठी आणि ऑडिओफाइर ग्रेडचा परफॉर्मन्स मिळावा यासाठी Nothing Headphone (1) मध्ये हाय रेस ऑडिओ, LDAC, USB-C लॉसलेस प्लेबॅक आणि ३.५ मिमी वायर्ड मोड आहेत. एएनसीसह यात ३५ तासांपर्यंतचा प्लेबॅक टाईम मिळतो. तसेच अवघ्या पाच मिनिटांच्या चार्जमध्ये २.४ तास ऐकण्याची सोय होते. ड्युएल डिव्हाइस कनेक्टिव्हीटी, एआय समर्थित सुस्पष्ट कॉल आणि चॅनल हॉप तसेच अॅडव्हान्स ईक्यू अशा इन अॅप कस्टमायझेशन टूल्समध्ये सोय आणि वैयक्तिक स्वरूप ही वैशिष्ट्ये अधिक ठळक होतात.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In उद्योग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पाणी पुरवठा विभागाच्यावतीने थकीत 27 कनेक्शन व 7 अनाधिकृत कनेक्शनवर कारवाई

पाणी पुरवठा विभागाच्यावतीने थकीत 27 कनेक्शन व 7 अनाधिकृत कनेक्शनवर कार…