Home उद्योग अदाणी ग्रुप उभारणार जागतिक दर्जाचे, किफायतशीर आणि एआय-आधारित हेल्थकेअर इकोसिस्टम

अदाणी ग्रुप उभारणार जागतिक दर्जाचे, किफायतशीर आणि एआय-आधारित हेल्थकेअर इकोसिस्टम

4 second read
0
0
38

no images were found

अदाणी ग्रुप उभारणार जागतिक दर्जाचे, किफायतशीर आणि एआय-आधारित हेल्थकेअर इकोसिस्टम

 

‘द ताज महाल पॅलेस हॉटेल’ येथे आयोजित सोसाइटी फॉर मिनिमली इनवेसिव्ह स्पाइन सर्जरी – एशिया पॅसिफिक (SMISS-AP) च्या पाचव्या वार्षिक संमेलनात बोलताना श्री अदाणी म्हणाले की, भारतात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित, मल्टीडिसिप्लिनरी हेल्थकेअर इकोसिस्टम उभारण्याचा त्यांचा उद्देश आहे – जे जागतिक दर्जाचे, सुलभ, किफायतशीर आणि मोठ्या प्रमाणावर लागू करता येण्याजोगे असेल. “आपण भारताच्या उज्ज्वल उद्यासाठी एक एकात्मिक, सर्वसमावेशक आणि प्रेरणादायी हेल्थकेअर सिस्टम तयार करण्यासाठी कटिबद्ध आहोत,” असेही ते म्हणाले.

श्री अदाणी यांनी भारतात लोअर बॅक पेन (कंबरेखालील पाठदुखी) हे अपंगत्वाचे सर्वात मोठे कारण आहे असे सांगितले . ही समस्या डायबिटीज आणि हृदयविकारांपेक्षा अधिक गंभीर झाल्याचे त्यांनी नमूद केले. “आपल्याला जर देशाच्या स्वप्नांचा भार पेलायचा असेल, तर आधी देशवासियांची ‘रीढ’ म्हणजेच पाठ मजबूत आणि निरोगी ठेवण्यावर लक्ष द्यावं लागेल. असं ते म्हणाले. या संमेलनात उपस्थित असलेल्या जगभरातील स्पाइन सर्जन्स आणि तज्ज्ञांना त्यांनी आवाहन केले की,  “फक्त वैद्यकीय क्षेत्राचे  नेते म्हणून नका काम करु, तर राष्ट्रनिर्मितीतही सक्रिय भाग घ्या.”

अहमदाबाद आणि मुंबई येथे उभारल्या जाणाऱ्या 1000 बेडच्या अदाणी हेल्थकेअर टेम्पल्सचा उल्लेख करताना श्री अदाणी म्हणाले की, “हे जागतिक दर्जाचे, किफायतशीर आणि एआय-आधारित हेल्थकेअर हब असतीलज्यात मॉड्यूलर आणि स्केलेबल पायाभूत सुविधा असतील ज्या साथीच्या आजाराच्या किंवा कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत वेगाने वाढवता येतील.” हे कॅम्पस क्लिनिकल केअर, संशोधन आणि शैक्षणिक प्रशिक्षणासाठी उत्कृष्टतेची केंद्रे बनतील, ज्यांचे मार्गदर्शन मायो क्लिनिकच्या डिझाइन, वैद्यकीय पायाभूत सुविधा, नवकल्पना (इनोव्हेशन) आणि जागतिक कौशल्याद्वारे केले जाईल.

गौतम अदाणी म्हणाले, “आम्ही हेल्थकेअर क्षेत्रात यासाठी आलो नाही की इथे प्रगतीचा वेग कमी होता, तर यासाठी आलो की हा वेग पुरेसा नव्हता. हेल्थकेअर क्षेत्राला थोड्याफार सुधारणांची आवश्यकता नाही, तर बुद्धिमत्ता आणि संवेदनशीलतेसह परिवर्तनाची आवश्यकता आहे.” त्यांनी आरोग्य क्षेत्रासाठी पाच मूलभूत तत्त्वांवर आधारित भविष्यातील एक प्रणाली मांडली:

पारंपरिक विभागांच्या मर्यादा मोडणारी एकात्मिक आरोग्यसेवा मॉड्युलर आणि स्केलेबल पायाभूत सुविधा

रोबोटिक्स आणि एआय आधारित वैद्यकीय शिक्षण

नर्सिंग आणि पॅरामेडिकल प्रशिक्षणावर भर

कागदपत्रांपेक्षा रुग्णाला प्राधान्य देणारे हेल्थ इन्शुरन्स मॉडेल

श्री अदाणी यांनी वैद्यकीय उद्योजकांना “एआय-आधारित स्पाइनल डायग्नोस्टिक्स, ग्रामीण भागात सर्जिकल युनिट्स, आणि रोबोटिक स्पाइनल केअरसाठी जागतिक केंद्र उभारण्यासाठी नव्या आणि धाडसी क्षेत्रांचा शोध घेण्याचे आह्वान केले.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In उद्योग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…