Home राजकीय भीती दाखवून कोणतीही भाषा टिकवता येत नाही– शिखर पाहाडिया

भीती दाखवून कोणतीही भाषा टिकवता येत नाही– शिखर पाहाडिया

0 second read
0
0
53

no images were found

भीती दाखवून कोणतीही भाषा टिकवता येत नाही– शिखर पाहाडिया

कोल्हापूर-(प्रतिनिधी):महाराष्ट्रात सध्या हिंदी आणि मराठी भाषांमधील तणाव वाढताना दिसतोय. अशा वेळी शिखर पाहाडिया यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत आपले मत मांडले आहे. काही राजकीय कार्यकर्ते मराठी न बोलणाऱ्यांवर आक्रमक होत असताना, शिखर म्हणाले की भीती पसरवून कोणतीही भाषा जिवंत राहू शकत नाही.मराठी अस्मिता ही खरी आहे, खोल आहे आणि आपल्या जीवनाशी जोडलेली आहे.
शिखर म्हणाले की प्रत्येक भाषेचं संरक्षण महत्त्वाचं आहे, पण त्यासाठी इतरांचा अपमान होऊ नये.
“मी स्वतः सोलापूरचा आहे, त्यामुळे या गोष्टी मला चांगल्या समजतात. भाषा आपली ओळख घडवते. त्यातून आपले राज्य, आपल्या कथा, कविता, गीते आणि क्रांती घडल्या. मराठी त्याचाच भाग आहे. तिला जपणं, वाढवणं गरजेचं आहे. पण हा अभिमान इतरांची किंमत कमी करून नको. विशेषतः अशा लोकांची, जे प्रामाणिकपणे मेहनत करत आहेत. पण भीती निर्माण करून कोणतीही भाषा जिवंत राहू शकत नाही.”
शेवटी ते म्हणाले –“मुंबई, महाराष्ट्र आणि भारत हा प्रत्येकाचा आहे – जो आदराने जगतो, प्रामाणिकपणे काम करतो आणि नम्रतेने बोलतो, तो कुठलीही भाषा बोलत असो. मराठी अस्मिता धमक्या देऊन नाही, तर लोकांना जवळ घेऊन आणि प्रेमाने वागताना खुलत जाईल. मराठी भाषा जपायची असेल, तर तिचा सन्मान करा – तिला शस्त्र बनवू नका.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

कोल्हापूर शहरातील तावडे हॉटेल ते छत्रपती शिवाजी पुलापर्यंत उड्डाण पुल उभारण्याच्या कामाला गती मिळावी, खासदार धनंजय महाडिक यांची संसदेत मागणी

कोल्हापूर शहरातील तावडे हॉटेल ते छत्रपती शिवाजी पुलापर्यंत उड्डाण पुल उभारण्याच्या कामाला …